श्रीदेवीने निधनापूर्वी लेकीला दिला खास सल्ला, आईच्या आठवणी सांगताना जान्हवी कपूर म्हणते…

अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा श्रीदेवीचे जुने फोटो शेअर करुन आपल्या आईच्या आठवणी शेअर करत असते. जान्हवीच्या पोस्ट्सवरून हे स्पष्ट दिसून येते की, ती अजूनही आपल्या आईला किती मिस करते.

श्रीदेवीने निधनापूर्वी लेकीला दिला खास सल्ला, आईच्या आठवणी सांगताना जान्हवी कपूर म्हणते...
जान्हवी कपूर

मुंबई : बॉलिवूडची ‘हवाहवाई’ अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी 2018मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. अभिनेत्री श्रीदेवी नेहमीच तिच्या बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जात असे. परंतु, ज्या प्रकारे अभिनेत्रीची अचानक एक्झिट झाली की, तिच्या कुटूंबातील हे अंतर कधीही भरले जाऊ शकणार नाही. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) व खुशी कपूर बर्‍याचदा तिच्या आठवण शेअर करताना दिसतात (Sridevi gave a special advice to daughter actress Janhvi Kapoor).

अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा श्रीदेवीचे जुने फोटो शेअर करुन आपल्या आईच्या आठवणी शेअर करत असते. जान्हवीच्या पोस्ट्सवरून हे स्पष्ट दिसून येते की, ती अजूनही आपल्या आईला किती मिस करते. अशा परिस्थितीत नुकत्याच एका मुलाखतीत जान्हवीने पुन्हा एकदा आपल्या आईची मनापासून आठवण काढत, तिच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

आई श्रीदेवीने जान्हवी कपूरला दिला होता खास सल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर हिने नुकतीच एका मुलाखतीत सांगितले होते की, तिची आई एक शक्तिशाली आणि हुशार महिला होती, आणि आजही ती आईने दिलेला एक सल्ला आठवून, त्याचप्रमाणे काम करते. आई श्रीदेवीने तिला कोणता विशेष सल्ला दिला होता, याबद्दल जान्हवीने सांगितले होते. या मुलाखतीत बोलताना जान्हवी कपूर म्हणाली की, आलिया भट्ट, सारा अली खान किंवा कोणत्याही सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मिठी मारता येणे प्रेरणादायक आहे, मात्र कशासाठीही कोणावर अवलंबून राहू नये.

एकदा तिची आई श्रीदेवीने तिला सांगितले होते की, ‘तिने कधीही कोणावर अवलंबून राहू नये आणि तिने स्वतःची ओळख स्वतःच्या हिमतीवर बनवावी.’ जान्हवी पुढे म्हणाली की, माझ्या आसपास अनेक शक्तीशाली स्त्रिया आहेत, माझ्या सहकारी ते आलिया, सारा यांच्यापासून बियॉन्से ते माझी बहीण खुशी या सर्वांना पाहून मला प्रेरणा मिळते, या स्त्रिया समाजात अतिशय मानाने वावरतात आणि कशासाठीही कोणावर अवलंबून राहत नाहीत.’(Sridevi gave a special advice to daughter actress Janhvi Kapoor)

लेकीला मोठ्या पडद्यावर पाहता आले नाही!

यानंतर, जान्हवी पुढे म्हणाली की, आईने मला स्पष्ट सांगितले होते की, कधीही कोणावरही अवलंबून राहू नकोस आणि आपली स्वतःची ओळख बनव.’ जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट ‘धडक’ रिलीज होण्यापूर्वीच श्रीदेवी यांचे निधन झाले होते. श्रीदेवी आपल्या मुलीच्या बॉलिवूड लॉन्चिंगमुळे खूपच खूश झाल्या असल्या तरी, त्यांना आपल्या मुलीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहता आले नाही.

सध्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री जान्हवी कपूर शेवट हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रुही’मध्ये दिसली होती. त्यात अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांची देखील मुख्य भूमिका होती. आता ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर ‘दोस्ताना 2’ मध्येही दिसणार आहे.

(Sridevi gave a special advice to daughter actress Janhvi Kapoor)

हेही वाचा :

नितीश भारद्वाज यांच्या स्मितहास्यावर भाळले ‘महाभारत’चे निर्माते, दिग्गजांना मागे टाकत मिळाली ‘श्रीकृष्णा’ची भूमिका!   

Photo : करण मेहराचे विवाहबाह्य संबंध!, पत्नी निशा रावलकडून भांडाफोड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI