नुसता राडा! RRR बघायला गेले अन् खळखट्याक करून आले!, पाहा आरआरआर चाहत्यांचा ‘तोडफोड’ व्हीडिओ…

नुसता राडा! RRR बघायला गेले अन् खळखट्याक करून आले!, पाहा आरआरआर चाहत्यांचा 'तोडफोड' व्हीडिओ...
RRR सिनेमाच्या शोवेळी राडा
Image Credit source: TV9

RRR Movie : ‘आरआरआर’ चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर तुफान आलंय. हा सिनेमा बॉक्सऑफिससह सिनेरसिकांच्या मनावर राज्य करतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. काही थिएटर बाहेर रांगा लागल्याचं पहायला मिळेतय. अश्यात काही ठिकाणी राडा झाल्याचंही पहायला मिळतंय. एक थिएटरमधला राड्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आयेशा सय्यद

|

Mar 26, 2022 | 2:56 PM

मुंबई: सध्या दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर तुफान आलंय. हा सिनेमा बॉक्सऑफिससह सिनेरसिकांच्या मनावर राज्य करतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. काही थिएटर बाहेर रांगा लागल्याचं पहायला मिळेतय. अश्यात काही ठिकाणी राडा झाल्याचंही पहायला मिळतंय. एक थिएटरमधला राड्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हीडिओ आंध्रप्रदेशातील विजयवाडाचा (Vijaywada) आहे. या व्हिडीओत थिएटरची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे RRR हा चित्रपट संपूर्ण दाखवता आला नाही. चित्रपट बघता आला नाही म्हणून चाहत्यांनी संतप्त होऊन तोडफोड केली आहे.

…म्हणून खळखट्याक!

एक थिएटरमधला राड्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हीडिओ आंध्रप्रदेशातील विजयवाडाचा आहे. या व्हिडीओत थिएटरची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे RRR हा चित्रपट संपूर्ण दाखवता आला नाही. चित्रपट बघता आला नाही म्हणून चाहत्यांनी संतप्त होऊन तोडफोड केली आहे.

आनंद पोटात मावेना!

RRR हा सिनेमा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सिनेमा बघण्यासाठी गर्दी होताना पहायला मिळतेय. एका थिएटरमध्ये तर प्रेक्षकांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रेक्षकांचा नाचतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

कोट्यावधींचा गल्ला

आरआरआर या सिनेमाने प्रदर्शनाच्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 18 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई कश्मिर फाईल्सपेक्षा खूप जास्त आहे. द काश्मीर फाईल्सने पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय.

संबंधित बातम्या

Video : Urfi Javed बिकिनी घालून चाफ्याच्या शोधात, नेटकरी म्हणतात “तुला फुलांची नाही, कपड्यांची गरज”

RRR Movie First Day Collection : आरआरआरची पहिल्याच दिवशी कोट्यावधींची कमाई,’The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

Iqbal Singh Chahal यांच्या भावाची Sonu Nigam ला धमकी?, अमित साटम यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित, चहल म्हणतात “माझा काहीही संबंध नाही!”

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें