RRR Box Office Collection : ‘आरआरआर’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, 100 कोटींपासून केवळ काही पावलं दूर…

RRR Box Office Collection : 'आरआरआर'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, 100 कोटींपासून केवळ काही पावलं दूर...
आरआरआर- सिनेमा

RRR Box Office Collection: आरआरआर या सिनेमाने पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे

आयेशा सय्यद

|

Mar 29, 2022 | 3:29 PM

मुंबई : एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने (RRR Movie) पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाई करतोय. कालही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे. तर  या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे.

RRR ची भारतातील कमाई

आरआरआर या सिनेमाने पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे.

शुक्रवार- 19 कोटी रुपये

शनिवार- 24 कोटी रुपये

रविवार- 31.50 कोटी रुपये

सोमवार – 17 कोटी रुपये

एकूण- 91.50 कोटी रुपये

RRRची जगभरातील कमाई

RRRची जगभरात क्रेझ आहे. जगभरात रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये RRRचा समावेश झाला आहे. राजामौलींच्या या बिग बजेट चित्रपटाने जरी 500 कोटींपर्यंत गल्ला जमवला असला तरी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’चा पहिल्या वीकेंडचा विक्रम अबाधित राहिला. बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 526 कोटी रुपये कमावले होते.

पहिला दिवस- 257.15 कोटी रुपये

दुसरा दिवस- 114.38 कोटी रुपये

तिसरा दिवस- 118.63 कोटी रुपये

एकूण- 490.16 कोटी रुपये

सिनेमासाठी थिएटरबाहेर गर्दी

सध्या दाक्षिणात्य अभिनेता राम चरण  आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर तुफान आलंय. हा सिनेमा बॉक्सऑफिससह सिनेरसिकांच्या मनावर राज्य करतोय. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत. काही थिएटर बाहेर रांगा लागल्याचं पहायला मिळेतय.

संबंधित बातम्या

Miss Universe हरनाझ संधूला ओळखणं कठीण; तीन महिन्यांत इतकं बदललं रुप…

6 ऑस्कर जिंकलेल्या Dune चित्रपटाचं भारत कनेक्शन; नमित मल्होत्रा यांची अभिमानास्पद कामगिरी!

Rakh: मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें