Sunny Deol Net Worth | अभिनयच नव्हे तर राजकारणातही सक्रिय, पाहा किती संपत्तीचा मालक आहे सनी देओल?

बॉलिवूड स्टार सनी देओलला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या चित्रपटांमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांना त्याच्या चित्रपटांचे संवाद अगदी तोंडपाठ आहेत. सनी देओल अभिनेता सोबत निर्माता देखील आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट विक्रम करतो.

Sunny Deol Net Worth | अभिनयच नव्हे तर राजकारणातही सक्रिय, पाहा किती संपत्तीचा मालक आहे सनी देओल?
Sunny Deol
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 11:46 AM

मुंबई : बॉलिवूड स्टार सनी देओलला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या चित्रपटांमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांना त्याच्या चित्रपटांचे संवाद अगदी तोंडपाठ आहेत. सनी देओल अभिनेता सोबत निर्माता देखील आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट विक्रम करतो. सनी इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

आज सनी देओल त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर सनीने आता राजकारणात प्रवेश केला आहे आणि निवडणुकाही जिंकल्या आहेत. आज सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्याच्या नेटवर्थबद्दल सांगणार आहोत…

सनी देओलचे नेटवर्थ किती?

Caknowledge.com च्या अहवालानुसार, सनी देओलची एकूण संपत्ती 120 कोटी आहे. त्याच्या कमाईचे मुख्य स्त्रोत म्हणजे चित्रपट आणि ब्रँडची मान्यता. या व्यतिरिक्त, सनी देओल देखील चित्रपटाच्या नफ्यातून काही भाग घेतो. सनी देओल वादांपासून नेहमीच दूर राहतो. त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला आवडते. विशेषतः त्याच्या मुलांसोबत!

सनी देओलने नुकतेच त्याच्या दोन चित्रपटांची घोषणा केली आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर येत्या तीन वर्षांत त्याच्या संपत्तीमध्ये 40 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

सनी देओलचे घर

सनी देओल त्याचे वडील धर्मेंद्र यांच्या आलिशान घरात राहतो. हे घर मुंबईतील विलेपार्ले येथे आहे. अहवालानुसार, या घराची किंमत सुमारे 6 कोटी आहे. सनी देओलची देशातील इतर शहरांमध्येही मालमत्ता आहे.

लक्झरी कार

सनी देओलकडे काही आलिशान वाहने आहेत. या संग्रहात ऑडी 8, रेंज रोव्हर सारखी अनेक वाहने आहेत.

जर, अहवालांवर विश्वास ठेवला तर सनी देओल एका चित्रपटासाठी 5-6 कोटी घेतो, त्यासोबत त्याचा नफ्यात देखील काही वाटा असतो. दुसरीकडे, जेव्हा ब्रँड एंडोर्समेंटचा प्रश्न येतो, तेव्हा तो एका ब्रँडला मान्यता देण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपये घेतो.

सनी देओलचे चित्रपट

सनी देओलच्या टॉप चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ‘गदर’, ‘इंडियन’, ‘अपना’, ‘सोनी महिवाल’, ‘अर्जुन’, ‘जिद्दी’, ‘घायल’, ‘बॉर्डर’, ‘घातक’ इत्यादी… आपल्याला सांगू की, गदर रिलीज झाल्यानंतर 20 वर्षांनी सनी देओल या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात सगळे जुने कलाकार दिसणार आहेत.

मुख्य जोडी म्हणून सनी-अमीषाच आघाडीवर!

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु निर्मात्यांनी आत्ताच त्याबद्दलची योजना आखली आहे. याशिवाय चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारांशीही संपर्क साधला जात आहे.

उत्कर्ष देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा :

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या घरात आणखी एक लव्हस्टोरी फुलणार? तेजस्वीला पसंत करू लागलाय करण कुंद्रा!

Sooryavanshi : ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी ‘द बिग पिक्चर’च्या मंचावर पोहोचले रोहित आणि कतरिना, अक्षय प्रमोशनपासून लांब का?

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.