Swara Bhasker | ‘तुझ्याशी लग्न कोण करेल..?’, मुल दत्तक घेण्याच्या स्वराच्या निर्णयावर चाहते का नाराज?

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले बिनधास्त मत मांडत असते. आपल्या बोल्ड शैलीमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Swara Bhasker | ‘तुझ्याशी लग्न कोण करेल..?’, मुल दत्तक घेण्याच्या स्वराच्या निर्णयावर चाहते का नाराज?
Swara Bhasker

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले बिनधास्त मत मांडत असते. आपल्या बोल्ड शैलीमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, तिला एक मूल दत्तक घ्यायचे आहे. अहवालानुसार, अभिनेत्रीने आपले नाव केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) मध्ये संभाव्य दत्तक पालक (PAP) म्हणून नोंदवले आहे.

स्वराने तिच्या निर्णय आणि कार्यपद्धतीबद्दल सांगितले आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, मी मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही लोकांना माझ्याशी लग्न कोण करणार याची काळजी वाटते आहे.

मला नेहमीच एक कुटुंब हवं होतं!

फ्री प्रेस जर्नलशी बोलताना स्वरा म्हणाली की, ‘ही या टप्प्याची सुरुवात आहे, कारण ही प्रक्रिया खूप लांब आहे. त्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. मला असे वाटते की, राज्य आणि CARA अतिशय काळजीपूर्वक ठरवतात की, ज्या पालकांना मुल दिले जात आहेत, ते पालक त्यांची काळजी नीट घेतील का? ते मुलांना खरे प्रेम आणि संरक्षण देतील का? याची काळजी घेतली जाते’.

स्वरा म्हणाली की, ‘मला नेहमीच एक कुटुंब आणि मुले हवी आहेत. पालक बनण्यासाठी विवाह करणे गरजेचे नाही. सुदैवाने भारतात, राज्य एकल महिलांना मुलं दत्तक घेण्याची परवानगी देते. मी अनेक जोडप्यांना भेटले, ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत, दत्तक घेतलेल्या आणि आता जवळजवळ प्रौढ झालेल्या काही मुलांना भेटले. यातील प्रक्रिया आणि अनुभव देखील जाणून घेतले’.

स्वरा भास्करही चाहत्यांवर नाराज!

स्वराने खुलासा केला की, मूल दत्तक घेण्याच्या निर्णयानंतर लोक तिला टिपिकल प्रश्न विचारत आहेत. काही लोक म्हणाले की, अरे आता तू लग्न करणार नाहीस का? किंवा तुझ्याशी लग्न कोण करणार? पण माझे आई-वडील, भाऊ, वहिनी आणि जवळच्या मित्रांनी माझ्या निर्णयाचा आदर केला आणि पाठिंबा दिला. यापूर्वी रवीना टंडन आणि सुष्मिता सेन यांनीही अविवाहित असताना मुले दत्तक घेतली होती. अभिनेत्री म्हणाली, मला माहित आहे की, सिंगल मदर असणे हे एक मोठे पाऊल आहे. मूल दत्तक घेतल्याच्या बातम्यांनंतर तिची तुलना सुष्मिता आणि रवीना टंडनशी झाली होती.

वेब सीरीजमध्ये झळकणार स्वरा!

आई होण्याच्या आनंदाची स्वरा आतुरतेने वाट पाहत आहे. स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची ‘रासभरी’, ‘भाग बिन्नी भाग’ यासह अनेक ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये दिसली होती. स्वरा पुन्हा एकदा तिच्या आगामी मर्डर मिस्ट्री ‘मीमांसा’मध्ये तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा :

बॉलिवूडची चर्चित नावं, तरी मृत्यूने गाठलं अन् कुणाला कळलंच नाही! ब्रह्माच नाही तर ‘या’ कलाकारांचा शेवटही वेदनादायी!

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!


Published On - 10:45 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI