AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story चित्रपट बघायला गेलेल्या प्रेक्षकांना धक्काबुक्की करून थेट काढले थिएटर बाहेर, या राज्यात धक्कादायक प्रकार

द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी या चित्रपटाने धमाकेदार सुरूवात देखील केलीये. द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी अनेकांनी करत थेट कोर्टात धाव देखील घेतली. शेवटी हा चित्रपट 5 मेला रिलीज झालाय.

The Kerala Story चित्रपट बघायला गेलेल्या प्रेक्षकांना धक्काबुक्की करून थेट काढले थिएटर बाहेर, या राज्यात धक्कादायक प्रकार
| Updated on: May 09, 2023 | 3:38 PM
Share

मुंबई : द केरळ स्टोरी या चित्रपट मोठ्या वादामध्ये सापडलाय. मुळात म्हणजे द केरळ स्टोरी (The Kerala Story)  या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासूनच सतत या चित्रपटाला विरोध केल जात होता. अनेकांनी थेट द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील केली. मात्र, मोठ्या वादानंतर शेवटी हा चित्रपट (Movie) 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. एकीकडे विरोध सुरू असतानाच दुसरीकडे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे ही वस्तूस्थिती आहे. मुळात म्हणजे अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो देखील रद्द करण्यात आले.

अनेक राज्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. कोची शहरातील अनेक ठिकाणी थिएटर मालकांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाचे शो बंद केले आहेत. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये राज्य सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेत राज्यात द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातलीये. मात्र, सोशल मीडियावर चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सपोर्ट हा केला जातोय.

हा सर्व वाद सुरू असतानाच पश्चिम बंगालमधील सरकारने देखील द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली आहे. आता पश्चिम बंगाल राज्यात लोकांना थिएटरमध्ये जाऊन द केरळ स्टोरी हा चित्रपट बघता येणार नाहीये. द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घातल्यानंतर अनेकांनी ममता बॅनर्जी यांना टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली.

द केरळ स्टोरी हा चित्रपट बघायला गेलेल्या प्रेक्षकांना पश्चिम बंगालमध्ये धक्के मारून थिएटरच्या बाहेर काढण्यात आल्याची घटना घडलीये. अचानक लोकांना थिएटर बाहेर काढण्यात आले. यामुळे लोकांनी आपला संताप व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी थिएटर बाहेर धरणे आंदोलन देखील केले.

द केरळ स्टोरी चित्रपट बघायला गेलेल्या अनेक लोकांनी तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी देखील केली. अनेक थिएटरमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटाचे पोस्टर देखील फाडण्यात आले. एकीकडे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये चित्रपटावर बंदी घातली तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. पहिल्या दिवशी धमाकेदार कामगिरी या चित्रपटाने केली. विशेष म्हणजे विकेंडला देखील चित्रपटाचा जलवा हा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळाला.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक