Manoj Bajpayee Net Worth | करोडोंची मालमत्ता, महागड्या गाड्यांचा ताफा, पाहा ‘फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयीची संपत्ती किती?

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कोणताही ‘गॉडफादर’ हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर केले आहे. अभिनेता मनोज बाजपेयींबद्दल (Manoj Bajpayee) बोलयाचे, तर ते या यादीमध्ये सर्वात अग्रक्रमी येतात. आपल्या दमकदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्याने एक खास ओळख निर्माण केली आहे.

Manoj Bajpayee Net Worth | करोडोंची मालमत्ता, महागड्या गाड्यांचा ताफा, पाहा ‘फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयीची संपत्ती किती?
मनोज बाजपेयी

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कोणताही ‘गॉडफादर’ हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर केले आहे. अभिनेता मनोज बाजपेयींबद्दल (Manoj Bajpayee) बोलयाचे, तर ते या यादीमध्ये सर्वात अग्रक्रमी येतात. आपल्या दमकदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्याने एक खास ओळख निर्माण केली आहे. एक काळ असा होता की, मनोजला कोणी ओळखत नव्हते, अभिनेत्याला छोट्या छोट्या भूमिकांसाठीही संघर्ष करावा लागत. पण, आज मनोजने अभिनयापासून कमाईपर्यंत सर्व कलाकारांना तगडी स्पर्धा निर्माण केली आहे (The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee Net Worth).

मनोज बाजपेयी यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात 1994च्या ‘द्रोहकाल’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतरही अभिनेत्याला खूप कष्ट करावे लागले. त्यानंतर अभिनेत्याला ‘सत्या’ या चित्रपटापासून त्याची खरी ओळख मिळाली. आजवरच्या या मेहनतीच्या जोरावर तो आता लक्झरी आयुष्य जगतो. चला जाणून घेऊया मनोजची संपत्ती किती?

अभिनेत्याचे मानधन

एकेकाळी भुकेल्या पोटी झोपी जाणारा मनोज आज कोट्यावधी रुपयांमध्ये वावरतो. मीडिया रिपोर्टनुसार मनोज बाजपेयी एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक फी आकारतात. त्याचप्रमाणे मनोज बाजपेयींच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे तर, मीडिया रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 146.68 कोटी रुपये आहे.

मनोजचे घर

अभिनेता मुंबईतील त्याच्या आलिशान घरात राहतो. अंधेरी, मुंबई येथे असलेल्या ओबेरॉय टॉवरमध्ये अभिनेत्याचे स्वतःचे एक आलिशान घर आहे. 2007मध्ये मनोजने घर विकत घेतले. असं म्हणतात की, मनोजच्या या घराची किंमत जवळपास 8 कोटी आहे. सध्या अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री नेहा आणि मुलीसमवेत या आलिशान घरात राहतो. याशिवाय अभिनेत्याचे काही फ्लॅट्स आहेत, ज्यांची अधिकृत माहिती नाही. बिहारच्या नरकटियागंजमध्येही मनोज यांचे स्वतःचे घर आहे. तथापि, बिहारमधील या घरात केवळ अभिनेत्याचे पालकच राहतात.

गाड्यांचे कलेक्शन

अभिनेता मनोज बाजपेयी यांना वाहनांचीही खूप आवड आहे. त्यामुळे अभिनेत्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. या अभिनेत्याकडे बीएमडब्ल्यू 3 सीरीज, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनर सारख्या अनेक महागड्या कार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मनोज बाजपेयी अलीकडेच ‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरीजमध्ये दिसला आहे. या सीरीजसाठी मनोजचे खूप कौतुक झाले आहे. मनोजने पुन्हा एकदा मालिकेत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. मनोज बाजपेयीची ही सीरीज चाहत्यांमध्ये सध्या खूप चर्चेत आहे.

(The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee Net Worth)

हेही वाचा :

राज कुमार रावसोबत काम करू इच्छिते समांथा अक्किनेनी, पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

Throwback | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? कारकीर्दीच्या पहिल्या फोटोशूटमधील फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI