Liger | लायगरच्या निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी हिंदी वर्जनसंदर्भात घेतला हा मोठा निर्णय, चाहत्यांमध्ये निराशा…

विजय देवरकोंडा याने आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा बद्दल एक मोठे वक्तव्य केले होते. यानंतर विजय देवरकोंडा याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही बॉयकॉट लाइगर हा ट्रेंड बनला आहे.

Liger | लायगरच्या निर्मात्यांनी शेवटच्या क्षणी हिंदी वर्जनसंदर्भात घेतला हा मोठा निर्णय, चाहत्यांमध्ये निराशा...
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 9:50 AM

मुंबई : लायगर (Liger) चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट पुढे येते आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच चित्रपटाच्या हिंदी वर्जनसंदर्भात बातमी पुढे येतं आहे. हा चित्रपट आज म्हणजेच 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसतायंत. या चित्रपटातून विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांनी लायगरचे जोरदार प्रमोशन केले. मात्र, हिंदी वर्जनमधील चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये मोठे बदल करण्यात आलेत. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेलासोबत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढलीयं, मात्र, याबातमीमुळे चाहते निराश झाल्याचे दिसतंय.

गुरूवारी सकाळी चित्रपट प्रदर्शित होणार नाही

निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, लायगरचे हिंदी वर्जन गुरूवारी सकाळी प्रदर्शित होणार नाहीयं. गुरूवारी रात्री हिंदी वर्जन प्रदर्शित केले जाणार आहे. हिंदी प्रेक्षकांसाठी ही बातमी निराशाजनक आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी आणि तेलुगू भाषेत झाले असल्याने गुरुवारी सकाळी दक्षिण वर्जन प्रदर्शित करण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर तेलुगू भाषिक राज्यांमध्ये सुरुवात चांगली झाली आहे, मात्र, हिंदीमध्ये चांगले मार्केटिंग केले असूनही बुकिंगने चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

बॉयकॉट लायगर हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू

विजय देवरकोंडा याने आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा बद्दल एक मोठे वक्तव्य केले होते. यानंतर विजय देवरकोंडा याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही बॉयकॉट लायगर हा ट्रेंड बनला आहे. विजय देवरकोंडा म्हणाला की की, जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेता, तेव्हा तुमचा केवळ आमिर खानवरच परिणाम होत नाही तर हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होत असतो. अनेकांचे यावर पोट आहे, असेही विजय देवरकोंडा म्हणाला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.