Satish Kaushik | सतीश कौशिक यांचा मृत्यू नेमका झाला कसा?, पोस्टमार्टम रिपोर्टमधून सत्यसमोर

सतीश कौशिक यांच्या निधनाचा मोठा धक्का सर्वांनाच बसला आहे. अजूनही विश्वास बसत नाही की, सतीश कौशिक हे आपल्यामध्ये नाहीत. 7 मार्च रोजीच सतीश कौशिक यांनी होळी पार्टीला हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर हे सर्व घडले.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांचा मृत्यू नेमका झाला कसा?, पोस्टमार्टम रिपोर्टमधून सत्यसमोर
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 5:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कार वेळी सलमान खान याला देखील आपले अश्रू रोखणे अवघड झाल्याचे व्हिडीओमध्ये बघायला मिळाले. बाॅलिवूडचा दबंग खान अश्रू रोखण्यासाठी आकाशाकडे बघताना दिसला. दुसरीकडे सतीश कौशिक यांचे खास मित्र अनुपम खेर (Anupam Kher) हे तर सतीश कौशिक यांना शेवटचा निरोप देताना ढसाढसा रडताना दिसले. आज सकाळी एक व्हिडीओ (Video) इंस्टाग्रामवर शेअर करत अनुपम खेर हे सतीश कौशिक यांच्या आठवणीमध्ये भावूक झाल्याचे दिसले.

सतीश कौशिक यांचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मात्र, या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आणि त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण ज्या फॉर्म हाऊसमध्ये सतीश कौशिक पार्टीसाठी पोहचले होते, तिथे काही आक्षेपार्ह औषधे सापडली होती, यामुळे सतीश कौशिक यांचे निधन नेमके कशाने झाला हा प्रश्न उपस्थित होत होता.

आता शेवटी पोस्टमार्टम रिपोर्टसमोर आलीये. फॉर्म हाऊसमध्ये आक्षेपार्ह औषधे सापडली होती, त्यानंतर चाहते सतीश कौशिक यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टची आतुरतेने वाट पाहात होते. सतीश कौशिक यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सतीश कौशिक यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला आहे. यामुळे आता काही शंका शिल्लक राहिली नाहीये.

सतीश कौशिक हे 7 मार्च रोजी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या खास होळी पार्टीमध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी फुल धमाल केल्याचे देखील व्हिडीओमधून दिसत आहे. आता या होळी पार्टीमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. मुंबईतील होळी पार्टीनंतर सतीश कौशिक हे कुटुंबियांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्ली येथे गेले होते. त्यानंतर रात्री त्यांनी रात्री त्रास होत असल्याने हाॅस्पीटलमध्ये घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी अनुपम खेर यांनी सांगितली. अनुपम खेर यांच्या पोस्टनंतर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या. दिल्लीतून मुंबईमध्ये सतीश कौशिक यांचे पार्थिव आणले गेले. यावेळी सतीश कौशिक यांच्या घरी मोठ्या संख्येने बाॅलिवूड स्टार उपस्थित होते. यावेळी कोणीही आपले अश्रू लपवू शकत नव्हते. सतीश कौशिक यांच्या जाण्याने बाॅलिवूड विश्वावर मोठी शोककळा पसरलीये. प्रत्येकजण सतीश कौशिक यांनी मिस करताना दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.