RRR Movie | ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली 2’मध्ये ‘या’ गोष्टी समान! तुमच्या लक्षात आल्या का?

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली’ चित्रपट 'RRR'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ब्रिटीश राजवटीच्या कथेवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार होता. राजामौलींचा आगामी चित्रपट मैत्री, कपट आणि देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल.

RRR Movie | ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली 2’मध्ये ‘या’ गोष्टी समान! तुमच्या लक्षात आल्या का?
ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते 'अल्लुरी सीताराम राजू' आणि 'कोमाराम भीम कोण होते?
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 2:06 PM

मुंबई : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली’ चित्रपट ‘RRR’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ब्रिटीश राजवटीच्या कथेवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार होता. राजामौलींचा आगामी चित्रपट मैत्री, कपट आणि देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळेल. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याची भरभरून स्तुतीसुध्दा झाली. पण, ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ आणि ‘आरआरआर’ यांच्यात काही साम्य तुमच्या सर्वांच्या लक्षात आले का? नसेल तर हरकत नाही, आम्ही तुम्हाला सांगतो…

बाहुबली: द कन्क्लूजन आणि आरआरआरमध्ये साम्य काय?

‘बाहुबली : द कन्क्लूजन’ आणि ‘आरआरआर’मध्ये एक मोठी गोष्ट साम्य आहे, जी समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडे मागे जावे लागेल. 2017 मध्ये, चाहते ‘बाहुबली: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. तेव्हाच निर्मात्यांनी घोषणा केली की, ते लॉन्च इव्हेंटमध्ये ट्रेलर देखील लॉन्च करतील. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. निर्मात्यांनी या कार्यक्रमापूर्वीच ‘बाहुबली: द कन्क्लुजन’चा ट्रेलर रिलीज केला  आणि चाहत्यांना एक मोठे सरप्राईज मिळाले. यासंदर्भात बोलताना चित्रपट निर्माता करण जोहरने सांगितले होते की, तांत्रिक अडचणींमुळे ट्रेलर वेळेपूर्वी प्रदर्शित करण्यात आला.

RRR चा ट्रेलर वेळेआधी का रिलीज झाला?

आधी ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ आणि आता ‘RRR’ बाबतही तेच झाले आहे. मेकर्सने सांगितले की, RRR चा ट्रेलर दुपारी 4 वाजता यूट्यूबवर प्रदर्शित होईल. मात्र प्रत्यक्षात तो सकाळी 11 वाजता रिलीज करण्यात आला. आता हे सुद्धा तांत्रिक बिघाडामुळे झाले की, यामागे आणखी काही कारण होते, ते त्यांनाच ठावूक. ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ आणि ‘आरआरआर’ या दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर वेळेपूर्वीच रिलीज झाले होते. ट्रेलर लीक होण्याची भीती निर्मात्यांना होती की, त्यांना प्रेक्षकांना आश्चर्यचकित करायचे होते, हे मात्र कळलेच नाही.

सध्या ही गोष्ट सर्वांसाठीच सस्पेन्स आहे. आता यावर निर्माते काही बोलतात का, त्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. साऊथचा सुपरस्टार राम चरण, ज्युनियर एनटीआर स्टारर या चित्रपटात आलिया भट्ट-अजय देवगण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

Urfi Javed | निळ्या बिकिनीमध्ये उर्फी जावेदने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटो पाहून चाहते म्हणतायत…

Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल…’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!

Ananya Panday | नैन गुलाबी चैन गुलाबी, ‘बबली गर्ल’ अनन्या पांडेचा ‘गुलाबी’ अवतार पाहून चाहते म्हणतायत…

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.