कतरिनाशी साखरपुड्याच्या चर्चेवर अशी होती विकीच्या पालकांची प्रतिक्रिया, भाऊ सनीने सांगितला किस्सा…

अलीकडेच असे वृत्त चर्चेत आले होते की, विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी साखरपुडा केला आहे. या दोन्ही कलाकारांनी या वृत्तांना नाकारले नाही किंवा पुष्टी केली नाही. तथापि, नंतर दोघांच्या पीआर टीमने साखरपुड्याच्या बातम्या स्पष्टपणे नाकारल्या आणि या बातमीला केवळ अफवा असल्याचे म्हटले.

कतरिनाशी साखरपुड्याच्या चर्चेवर अशी होती विकीच्या पालकांची प्रतिक्रिया, भाऊ सनीने सांगितला किस्सा...
Vicky-Katrina

मुंबई : अलीकडेच असे वृत्त चर्चेत आले होते की, विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी साखरपुडा केला आहे. या दोन्ही कलाकारांनी या वृत्तांना नाकारले नाही किंवा पुष्टी केली नाही. तथापि, नंतर दोघांच्या पीआर टीमने साखरपुड्याच्या बातम्या स्पष्टपणे नाकारल्या आणि या बातमीला केवळ अफवा असल्याचे म्हटले. दरम्यान, आता विकीचा भाऊ सनी कौशलने खुलासा केला आहे की, जेव्हा विकी आणि कतरिनाच्या साखरपुड्याची गोष्ट त्याच्या पालकांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

विकीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल सांगतो की, जेव्हा त्याच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा ते खूप हसले. सनी कौशलने असेही सांगितले की, हे अहवाल समोर आल्यानंतर त्याच्या पालकांनी विकी कौशलची खूप टेर खेचली आणि त्याला आम्हाला मिठाई खायला दे असे देखील सांगितले. सनी असेही म्हणाला की, या अफवा कुठून सुरू झाल्या हे आम्हाला माहित नाही, पण त्यांच्यामुळे आम्ही खूप हसलो हे निश्चित आहे.

तुझं लग्न झालंय, मला मिठाई दे …

स्पॉटबॉयशी संभाषणादरम्यान, सनी कौशल म्हणाला की, ज्या दिवशी या अफवा येऊ लागल्या तो दिवशी आम्हाला खूप चांगला आठवतो आहे. विकी सकाळी जिमला गेला होता. जेव्हा तो घरी परतला, तेव्हा आई आणि बाबा खूप हसले आणि त्याला म्हणाले, ‘अरे यार, तुझा साखरपुडा झाला आहे. तू आम्हाला मिठाई खायला हवीस.  सनीने सांगितले की, यानंतर विकीने त्याच्या पालकांना सांगितले की, ‘जितका खरा हा साखरपुडा आहे, तेवढी खरी मिठाई तुम्ही खा.’

कतरिना आणि विक्कीच्या अफेअरच्या बातम्या 2019 पासून हेडलाईन्समध्ये आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याची कधीच पुष्टी केली नाही. दोघांना बऱ्याचदा पार्टी आणि आउटिंगसाठी एकत्र बाहेर जाताना पाहिले गेले आहे. अहवालांनुसार, दोघांनीही यावर्षीचे नवीन वर्ष महाराष्ट्रातील अलिबागमध्ये एकत्र साजरे केले. एवढेच नाही तर, या वर्षाच्या सुरुवातीला हर्षवर्धन कपूर यांनी विकी आणि कतरिना एकत्र असल्याची पुष्टी केली होती.

हर्षवर्धन यांना एका पोर्टलद्वारे बॉलिवूडमधील या चर्चित संबंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्हाला असे वाटते की ते सेलिब्रिटी कोण आहेत, ज्यांच्या नात्याच्या बातम्या सत्य आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले होते की, विकी आणि कतरिना एकत्र आहेत, हे खरे आहे. आणि हे सांगून मी अडचणीत येणार आहे का? मला माहित नाही. मला वाटते की ते त्यांच्या नात्याबद्दल खूप मोकळे आहे.

हेही वाचा :

Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?

Shaheer Sheikh | ‘पवित्र रिश्ता 2.0’मधील नव्या ‘मानव’च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI