AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaheer Sheikh | ‘पवित्र रिश्ता 2.0’मधील नव्या ‘मानव’च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!

प्रसिद्ध टीव्ही कलाकार शाहीर शेख (Shaheer Sheikh) आणि रुचिका कपूरच्या (Ruchika Kapoor) आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शाहीर आणि रुचिका 10 सप्टेंबर रोजी पालक झाले.

Shaheer Sheikh | ‘पवित्र रिश्ता 2.0’मधील नव्या ‘मानव’च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!
Shaheer sheikh
| Updated on: Sep 11, 2021 | 11:06 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही कलाकार शाहीर शेख (Shaheer Sheikh) आणि रुचिका कपूरच्या (Ruchika Kapoor) आयुष्यात एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. शाहीर आणि रुचिका 10 सप्टेंबर रोजी पालक झाले. एका सुंदर लहान मुलीचे त्यांच्या घरात आगमन झाले आहे. या व्यतिरिक्त अजून कोणतीही माहिती नाही. काही आठवड्यांपूर्वी शाहीरची पत्नी रुचिकाच्या बेबी शॉवरचा विधी पार पाडला होता आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली होती. आता चाहते नव्यानेच पालक बनलेल्या रुचिका आणि शाहीर यांना या गुड न्यूजबद्दल शुभेच्छा देत आहेत.

चिमुकल्या पावलांनी आली गोड परी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रुचिका कपूर तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसली होती. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले होते. रुचिका कपूरच्या आउटफिटबद्दल बोलायचे तर, ती गुलाबी रंगाच्या लांब ड्रेसमध्ये तिचा बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसली, तर शाहीर ग्रे कलरच्या टी-शर्टमध्ये दिसला. क्रिस्टल डिसूझा, रिद्धी डोगरा, तनुश्री दासगुप्ता आणि इतरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

लॉकडाऊनमध्ये उरकले लग्न

शाहीर आणि रुचिकाच्या लग्नाच्या बातम्या गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये समोर आल्या होत्या. कोर्ट मॅरेजनंतर हे जोडपे अभिनेत्याच्या पालकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जम्मूला पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईत छोटे रिसेप्शनही ठेवले होते. जून महिन्यात प्रथमच, चाहत्यांना रुचिकाच्या गर्भधारणेबद्दल कळले जेव्हा तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नवीन पोशाखाचा फोटो पोस्ट केला होता, जो एका प्रसूती पोशाख स्टोअरमधील होता. त्याचबरोबर तिने आणखी एक फोटो शेअर केला, ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. तेव्हापासून चाहत्यांना कल्पना होती की, ती लवकरच गोड बातमी देणार आहे.

शाहीर शेखने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, लग्नामुळे त्याचे आयुष्य कसे बदलले आहे. तो म्हणाला की, आता तो त्या टप्प्यात आहे जिथे तो दररोज नवीन गोष्टी शिकत आहे. शाहीरने सांगितले होते की, तो बराच काळ मुंबईत एकटा राहत होता आणि आता तो कोणासोबत आपले घर शेअर करायला शिकत आहे. त्याने असेही सांगितले की, त्याला रुचिकासाठी स्वयंपाक करायलाही आवडते.

लग्न साधेपणाने व्हावे असेच वाटत होते!

शाहीरने सांगितले की, तो लग्नानंतर मोठे रिसेप्शन देणार होता, पण कोरोनामुळे त्याला ते पुढे ढकलावे लागले. शाहीर म्हणाला, ‘याकाळात मी माझे दोन जवळचे नातेवाईक गमावले आहेत. मी खूप अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होतो. मला माझ्या आई-वडिलांनी मुंबईत यावे आणि माझ्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा होती. पण मला काळजी वाटते की, या काळात त्यांनी प्रवास करणे योग्य असेल का?

शाहीरने म्हटले होते की, त्याला फार दिखावेदार विवाह सोहळा नको होता. त्याला आपले लग्न साधेपणाने करायचे होते. लेकीच्या येण्याने आता शाहीरचे कुटुंबही पूर्ण झाले आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे तर, रुचिका एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सची डिव्हिजन हेड आहे. तर शाहीर ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘महाभारत’ आणि ‘ये रिश्ते है प्यार के’ सारख्या शोमध्ये दिसला आहे.

हेही वाचा :

No Land’s Man | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘नो लँड्स मॅन’ची पहिली झलक प्रदर्शित, पाहा अभिनेत्याचा भन्नाट लूक

Sai Dharam Tej Accident : टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.