AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

No Land’s Man | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘नो लँड्स मॅन’ची पहिली झलक प्रदर्शित, पाहा अभिनेत्याचा भन्नाट लूक

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये सतत व्यस्त असतो. नुकताच त्याचा ‘नो लँड्स मॅन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

No Land’s Man | नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘नो लँड्स मॅन’ची पहिली झलक प्रदर्शित, पाहा अभिनेत्याचा भन्नाट लूक
नवाजुद्दीन सिद्दिकी
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 11, 2021 | 10:31 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये सतत व्यस्त असतो. नुकताच त्याचा ‘नो लँड्स मॅन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर आपल्या मनात येणारा पहिला शब्द हा विचार करायला लावणारा आहे. आपल्या दमदार अभिनयाने आपली क्षमता सिद्ध करणारा अभिनेता आता ‘नो लँड्स मॅन’सह इंग्रजी फीचर फिल्ममध्ये प्रवेश करत आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या लूकमध्ये अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. जिथे त्याच्या शार्प आणि गंभीर अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लूकमध्ये, अभिनेता थेट कॅमेऱ्याकडे पाहताना दिसतो, जणू तो आपल्या डोळ्यांनी आपल्याकडे कॅमेरात खोलवर पाहत आहे. नवाजला आता सोशल मीडियाची ताकद पूर्णपणे समजली आहे. ज्यामुळे त्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचा केवळ एक टीझर नाही, तर एक लूक शेअर केला आहे, जो त्याच्या चाहत्यांना आवडत आहे.

पाहा पोस्टर :

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, “या मुलाबद्दल कोणाला माहिती आहे का? मी त्याला शोधत आहे. प्रतिष्ठित @busanfilmfest येथे किम जिसीओक पुरस्कारासाठी नो लँड्स मॅन या चित्रपटाला नामांकित करण्यात आले आहे आणि हा त्याचा पहिला लुक आहे! होय!.” अभिनेत्याची अशी शैली यापूर्वी कोणत्याही चित्रपटासाठी पाहिली गेली नव्हती. ज्यामुळे नवाजचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

प्रख्यात चित्रपट निर्माते मुस्तफा सरवर फारूकी दिग्दर्शित, या चित्रपटाला किम जिसेयोक पुरस्कारासाठी बुसान फिल्म फेस्टिव्हलमधून आधीच नामांकन मिळाले आहे. मुस्तफा सरवर फारुकी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाला श्रीहरी साठे, नुसरत इमरोज टिशा, नवाजुद्दीन सिद्दीकी, अंजन चौधरी आणि फरीदूर रजा सागर यांनी पाठिंबा दिला आहे. ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमान या प्रकल्पाचे कार्यकारी निर्माता आहेत आणि त्यांनी चित्रपटाचा अल्बम देखील तयार केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, नो लँड्स मॅनमध्ये मेगन मिशेल, तेहसान खान, ईशा चोप्रा, किरण खोजे आणि ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि भारतातील विक्रम कोचर आहेत.

कुटुंब दुबईला शिफ्ट झाले!

काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, नवाज आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना दुबईला स्थायिक करण्याचा विचार करत आहेत. जेथे आता त्यांच्या मुलांचे शिक्षण भारताबाहेर होणार आहे. याआधी संजय दत्तनेही असेच केले आहे. जिथे त्याने आता आपल्या कुटुंबाला दुबईला स्थायिक केले आहे.

हेही वाचा :

Sai Dharam Tej Accident : टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी

Happy Birthday Tulip Joshi | यशराज फिल्म्समधून बॉलिवूडमध्ये पदार्पण, लग्नानंतर करोडोंचा व्यवसाय सांभाळतेय ट्युलिप जोशी!

Happy Birthday Shriya Saran | रजनीकांतची रील लाईफ पत्नी म्हणून चर्चेत आली अभिनेत्री, वाचा श्रिया सरनबद्दल…

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…