Happy Birthday Tulip Joshi | यशराज फिल्म्समधून बॉलिवूडमध्ये पदार्पण, लग्नानंतर करोडोंचा व्यवसाय सांभाळतेय ट्युलिप जोशी!

‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ट्युलिप जोशीला (Tulip Joshi) यश राज बॅनरखाली तिच्या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्याची संधी मिळाली. हिंदी व्यतिरिक्त, ट्यूलिप जोशी हिने तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

Happy Birthday Tulip Joshi | यशराज फिल्म्समधून बॉलिवूडमध्ये पदार्पण, लग्नानंतर करोडोंचा व्यवसाय सांभाळतेय ट्युलिप जोशी!
ट्युलिप जोशी
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 7:50 AM

मुंबई : ‘मेरे यार की शादी है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ट्युलिप जोशीला (Tulip Joshi) यश राज बॅनरखाली तिच्या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्याची संधी मिळाली. हिंदी व्यतिरिक्त, ट्यूलिप जोशी हिने तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 11 सप्टेंबर 1979 रोजी जन्मलेली, ट्यूलिप जोशी आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

गुजराती कुटुंबातील मुलगी

ट्यूलिप जोशी हिचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. तिने जमनाबाई नरसी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मेजरिंग फूड सायन्स आणि केमिस्ट्रीमध्ये पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ट्युलिपने 2000 साली मिस इंडियामध्ये भाग घेतला, पण तिथे तिला यश मिळाले नाही.

आदित्य चोप्राने दिला मोठा ब्रेक

ट्यूलिप जोशीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण खूप चांगले होते. यशराजच्या बॅनरखाली पहिला चित्रपट तिला ऑफर करण्यात आला होता. या सिनेमाचे शीर्षक होते ‘मेरे यार की शादी है’. 2002 च्या चित्रपटात ट्युलिप सोबत जिमी शेरगिल, उदय चोप्रा आणि बिपाशा बसू देखील होते. खरंतर आदित्य चोप्रा याने एका मित्राच्या लग्नात ट्यूलिप पाहिले होते. तिला पाहिल्यानंतर आदित्यने तिला चित्रपटाची ऑफर दिली. ट्युलिप या चित्रपटाच्या ऑडिशनला आली आणि निवडली देखील गेली.

बॉलिवूडमध्ये नाही मिळाले यश

ट्यूलिप जोशीच्या कारकीर्दीतील यश बॉलिवूडमध्ये फार काळ टिकले नाही. तिचा पहिला चित्रपट ‘मेरे यार की शादी है’ मोठ्या पडद्यावर काही विशेष जादू करू शकला नाही. पण या चित्रपटानंतर ट्युलिप जोशीने शाहिद कपूरसोबत ‘दिल मांगे मोरे’ चित्रपटात काम केले. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर ट्युलिपने ‘धोखा कभी कहीं’, ‘सुपरस्टार’, डॅडी कूल ‘,’ रनवे’,’ हॉस्टेल’,’बी केअरफुल’,’जय हो’अशा काही चित्रपटांमध्ये काम केले.

कॅप्टन विनोद नायरशी बांधली लग्नगाठ

ट्युलिप चित्रपटांमध्ये काम करत असताना तिची भेट कॅप्टन विनोद नायर यांच्याशी झाली. या दोघांची भेट वाढली आणि ते प्रेमात पडले. ज्या दिवशी ट्युलिप विनोद नायर यांना भेटली, ते त्यांच्या ‘प्राईड ऑफ लायन्स’ या कादंबरीबद्दल चर्चेत होते. दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसेच, तब्बल 4 वर्षे ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायात रमलीय अभिनेत्री

माध्यम अहवालांनुसार विनोदने सप्टेंबर 2007मध्ये प्रशिक्षण आणि व्यवस्थापन सल्लागार फर्म सुरू केली. लग्नानंतर, ट्यूलिप जोशी आता विनोदसोबत ही 600 कोटींची कंपनी सांभाळत आहे. ती या कंपनीचे डायरेक्टर पद सांभाळत आहे. तिचे पती विनोद हे 1989 ते 1995 पर्यंत भारतीय लष्कराचा भाग होते. जिथे त्यांनी नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीरमधील उच्च जोखमीच्या मोहिमांमध्ये थेट ऑपरेशनमध्ये भाग घेतला.

हेही वाचा :

‘केबीसी 13’च्या मंचावर हजेरी लावणार दीपिका-फराह, ‘इंडियन आयडॉल’चे विजेते करणार गणपती बाप्पाची आरती!

कधी हसवतो तर कधी घाबरवतो सैफ-अर्जुनचा चित्रपट, वाचा कसा आहे ‘भूत पोलीस’?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.