Happy Birthday Shriya Saran | रजनीकांतची रील लाईफ पत्नी म्हणून चर्चेत आली अभिनेत्री, वाचा श्रिया सरनबद्दल…

बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगाची सुपरहिट नायिका श्रिया सरन (Shriya Saran) यावर्षी 11 सप्टेंबर रोजी आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रिया एक सुंदर प्रतिभावान अभिनेत्री तसेच एक उत्तम नृत्यांगना आहे.

Happy Birthday Shriya Saran | रजनीकांतची रील लाईफ पत्नी म्हणून चर्चेत आली अभिनेत्री, वाचा श्रिया सरनबद्दल...
श्रिया सरन

मुंबई : बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगाची सुपरहिट नायिका श्रिया सरन (Shriya Saran) यावर्षी 11 सप्टेंबर रोजी आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रिया एक सुंदर प्रतिभावान अभिनेत्री तसेच एक उत्तम नृत्यांगना आहे. तिने भारतीय शास्त्रीय तसेच पाश्चिमात्य नृत्यावर प्रभुत्व मिळवले आहे आणि यासाठी तिने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे जन्मलेल्या श्रियाने मनोरंजन विश्वात खूप नाव कमावले आहे. ती साऊथच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

डान्सिंग क्वीन श्रिया सरन

अभिनेत्री श्रिया सरन हिने दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील पुष्पेंद्र सरन भटनागर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल)मध्ये शिक्षक होते आणि आई नीरजा सरन दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. श्रियाला चित्रपटात प्रवेश करायचा असला, तरी तिने 2001मध्ये बनारसमध्ये एक व्हिडीओ शूट करून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रिया बॉलिवूड चित्रपट ‘दृश्यम’मध्ये अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.

एकाच वेळी चार चित्रपट केले साईन

श्रियाला रेणू नाथनच्या ‘थिरकाती क्यों हवा’ या म्युझिक व्हिडीओमध्ये नृत्य करण्याची मोठी संधी मिळाली होती. कॅमेऱ्यासमोर श्रियाची ही पहिली कामगिरी होती. इथेच श्रियाचे नशीब चमकले आणि तिला ‘इष्टम’ चित्रपटासाठी रामोजी फिल्म्सने करारबद्ध केले. या काळात श्रियाने एकाचवेळी चार चित्रपट साईन केले होते.

रजनीकांतच्या चित्रपटातून मिळाली ओळख

श्रिया 2003 साली बॉलिवूड चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ मध्ये दिसली होती. यानंतर तिने 2004 साली ‘थोडा तुम बदलो थोडा हम’ या चित्रपटात काम केले. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. श्रियाला तिची खरी ओळख रजनीकांतच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाच्या यशामुळे तिला ‘सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्री’चा पुरस्कारही मिळाला.

…म्हणून मागावी लागली जाहीर माफी!

तथापि, श्रिया देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचे नाव कधीकधी वादाशी संबंधित असते. ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटाच्या सिल्व्हर ज्युबली कार्यक्रमात ती शॉर्ट आणि डीप नेक असलेल्या पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसली होती. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी उपस्थित होते. श्रियाच्या या शॉर्ट ड्रेसबद्दल राजकीय लोकांनी आक्षेप नोंदवले होते. यासाठी श्रियाला माफीही मागावी लागली होती.

गुपचूप उरकले लग्न

यानंतर श्रियाने तिच्या रशियन बॉयफ्रेंड आंद्रेई कोश्चेव्हशी गुपचूप लग्न केले. त्याच्या लग्नाला खूप जवळचे लोक उपस्थित होते. श्रिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि अनेकदा तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करते, जे लोकांना खूप आवडतात.

हेही वाचा :

Sonakshi Sinha : ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅमरस अवतार, वेगवेगळ्या अंदाजात केलं फोटोशूट

केतकी चितळेला ‘ती’ पोस्ट आणखी भोवणार! ठाणे कोर्टाकडून अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन नामंजूर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI