2 लाखांत काकांनी लावली बोली, अभिनेत्री म्हणाली, ‘मी विकली…’, ऐश्वर्या रायसोबत खास कनेक्शन
Bollywood Actress Life: काकांचीच होती अभिनेत्रीवर वाईट नजर, 2 लाखांत लावलेली बोली, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, तिचं ऐश्वर्या रायसोबत खास कनेक्शन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Bollywood Actress Life: झगमगत्या विश्वात प्रत्येक अभिनेत्री स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. काहींना यश मिळतं, तर काही मात्र प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या प्रतिक्षेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, जया भट्टाचार्य… जया भट्टाचार्य हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक जया खलनायीकेच्या भूमिकेत दिसली. पण याच भूमिका अभिनेत्रीसाठी शाप देखील ठरल्या. कारण तब्बल 7 वर्ष अभिनेत्रीला नवीन भूमिकेची प्रतीक्षा करावी लागली.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. जेव्हा अभिनेत्री फक्त 17 – 18 वर्षांची असताना तिच्या घरी एका काका यायचे. ज्यांनी जया हिला गाडी चालवायला शिकवलं… त्यानंतर अभिनेत्रीला कळलं की या पुरुषाचे हेतू वाईट आहेत. त्याचे राजकीय संबंध होते आणि तो माफियांशीही जोडलेला होता. त्याने जयाला एक ऑफर दिली.
अभिनेत्री म्हणाली, ‘तो पुरुष मला म्हणाला माझ्यासोबत मुंबईत चल मी तुला माधुरी दीक्षित बनवेल… एवढंच नाही तर, त्याला माझ्यासोबत लग्न करायचं होतं. मला म्हणाला, माझ्यासोबत लग्न कर मी तुला 2 लाख रुपये देईल… यावर मी म्हणाली, मी विकली जाणारी नाही…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत झाला अपमान
जया हिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेत तब्बल 7 वर्ष कोणत्याच करारा शिवाय काम केलं. ‘त्या शोमध्ये सर्वात कमी मानधन माझं होतं. मालिकेतील सर्व कलाकारांच्या मानधनात 2 हजारांची वाढ करण्यात आली. पण माझी फक्त हजार रुपये वाढवण्यात आले. पण मी विचार केलेला मी स्वतः काहीही बोलणार नाही. मला सेटवर सन्मान मिळाला नाही. पण माझं कर्तव्य होतं म्हणून काम पूर्ण केलं. मला पुरस्कार सुद्धा दिला नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत खास कनेक्शन
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत जया यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात जया यांनी लहान पण महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट देखील ठरला…
सांगायचं झालं तर, जया भट्टाचार्य यांनी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कसम से’, ‘केसर’, ‘हातिम’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमीका बजावली. सध्या सर्वत्र जया भट्टाचार्य हिची चर्चा रंगली आहे.
