हार्ट अटॅक नाही… प्रसिद्ध अभिनेते टीकू तलसानिया यांना नेमकं काय झालं?, प्रकृती चिंताजनक का?; पत्नीची पहिली प्रतिक्रिया काय?

प्रसिद्ध अभिनेते टिकू तलसानिया यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने ते रुग्णालयात दाखल आहेत. यापूर्वी हार्ट अटॅकची बातमी पसरली होती, पण त्यांच्या पत्नींनी ब्रेन स्ट्रोकची पुष्टी केली. ते कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हार्ट अटॅक नाही... प्रसिद्ध अभिनेते टीकू तलसानिया यांना नेमकं काय झालं?, प्रकृती चिंताजनक का?; पत्नीची पहिली प्रतिक्रिया काय?
tiku talsania Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 5:18 PM

आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे सर्वांच्याच गळ्यातील ताईत झालेले प्रसिद्ध कॉमेडियन, ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया हे रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. त्यांना हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचीही सांगितलं जातंय. पण टीकू तलसानिया यांच्या प्रकृतीबाबतची खरी माहिती समोर आली आहे. तलसानिया यांना हार्ट अटॅक आलेला नाही, तर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं.

दीप्ती तलसानिया यांनी मीडियाशी संवाद साधताना टीकू तलसानिया यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यांना हार्ट अटॅक आलेला नाही. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला आहे. ते काल रात्री 8 वाजता एका सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची तब्येत बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं दीप्ती तलसानिया यांनी सांगितलं.

250 हून अधिक सिनेमात काम

टीकू तलसानिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. तसेच आपल्या लाडक्या अभिनेत्याला बरं वाटावं म्हणून त्यांचे चाहते प्रार्थनाही करत आहेत. टीकू तलसानिया हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत 250 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. प्रत्येक सिनेमातील त्यांची भूमिका छाप पाडणारी अशीच राहिली आहे.

अनोख्या विनोदी शैलीने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा टायमिंग अप्रतिम होता. त्यांना विनोदी अभिनय करताना कधीच कमरेखालचे विनोद करण्याची गरज पडली नाही. जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर ते दिसले तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना त्यांनी पोटभरून हसवलंय. सिनेमांच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केलंय.

टीकू तलसानिया यांनी 1984मध्ये आलेल्या ‘ये जो है जिंदगी’ या टीव्ही सीरिअलपासून त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 1986मध्ये ‘प्यार के दो पल’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान सारख्या बड्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय.

टीकू तलसानिया यांचे सिनेमे

टीकू तलसानिया यांनी आमिर आणि सलमान खानच्या अंदाज अपना अपना, इश्क, ढोल, कितने दूर कितने पास, धमाल आदी सिनेमात काम केलंय. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’मध्ये ते अखेरचे दिसले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्
अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्.
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट
सैफचा जीव वाचवणाऱ्या 'रियल लाइफ हिरो'ला मुंबईकरांचा असा सॅल्यूट.
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा
23 जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होणार,शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा.
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"