AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तरच्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. (Veteran actress Shashikala passes away at 88)

सत्तरच्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन
actress Shashikala
| Updated on: Apr 04, 2021 | 5:07 PM
Share

मुंबई: आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या जुन्या जमान्यातील अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. (Veteran actress Shashikala passes away at 88)

आज दुपारी 12 वाजता कुलाबा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. सत्तरच्या दशकात त्यांनी नायिका आणि खलनायिका रंगविल्या होत्या. त्यांच्या खलनायिकांच्या भूमिका त्या काळात प्रचंड गाजल्या होत्या. त्यांनी 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. सोलापूरमध्ये 4 ऑगस्ट 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. मात्र सिनेसृष्टीत संघर्ष करताना त्यांना अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांचे वडील फार मोठे उद्योजक होते. शशिकला यांना सहा बहिण आणि भाऊ होते.

नुरजहाँ भेटल्या अन्…

शशिकला यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नृत्य करण्यास सुरुवात केली. याच वेळी त्यांनी गाणं शिकण्यासही सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू अभिनय क्षेत्राकडे मोर्चा वळवला. त्यांच्या वडिलांचे उद्योगात दिवाळे निघाले. त्यामुळे त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. मुंबईत आल्यावर शशिकला यांची नुरजहाँ यांच्याशी भेट झाली. त्यामुळे त्यांना झीनत या सिनेमात काम मिळाले. त्यानंतर त्यांना आणखी तीनचार चित्रपटात काम केलं. त्यावेळी त्यांना 400 रुपये महिना मिळायचा. 1953 मध्ये व्ही. शांताराम यांनी त्यांना तीन बत्ती चार रास्ता या सिनेमात कामं केलं. त्यानंतर वयाच्या 20व्या वर्षीच त्यांनी संसार थाटला. प्रसिद्ध गायक के. एल. सहगल यांचे नातलग ओमप्रकाश सहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे त्यांना दोन मुलीही झाल्या.

खलनायिका म्हणून जम बसविला

शशिकला यांनी 1959मध्ये सुजाता या सिनेमात खलनायिका साकारली आणि त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर त्यांना खलनायिकेच्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या. त्यातही त्यांनी वेगळ्या भूमिका असणारे सिनेमे स्वीकारण्यास सुरुवात केली. आरती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अॅवार्डही मिळाला. तर गुमराह सिनेमातील उत्कृष्ट खलनायिकेचा फिल्म फेअर अॅवार्ड मिळाला.

पद्मश्री आणि रुग्णसेवा

सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं. तसेच त्यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवार्ड देऊनही गौरवण्यात आलं आहे. शेवटच्या काळात त्यांनी इगतपुरी येथील मदर तेरेसा यांच्या रुग्णालयात रुग्णसेवा करण्याचं काम केलं.

गाजलेले सिनेमे

‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (2003) नीला आकाश, छोटी सी मुलाकात, शतरंज, आहिस्ता-आहिस्ता, मुझसे शादी करोगी, आदी सिनेमात त्यांनी काम केलं आहे. त्या 2005 पर्यंत अभिनय करत होत्या. (Veteran actress Shashikala passes away at 88)

संबंधित बातम्या:

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट, अक्षय कुमार पाठोपाठ गोंविंदाही कोरोना पॉझिटिव्ह

‘लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला…’ या गाण्यासह दीपशाम मंगळवेढेकरांची गाजलेली गाणी माहिती आहेत का?

महेश भट, सुबोध भावे ते अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांशी संवादात टीव्ही-चित्रपट निर्मात्यांचा महत्त्वाचा निर्णय

(Veteran actress Shashikala passes away at 88)

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....