Vicky-Katrina Wedding | सलमान खान-अक्षय कुमारने कतरिनाच्या लग्नाला जाणं टाळलं? जाणून घ्या नेमकं कारण…

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ आज लग्न बंधनात अडकणार आहेत. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज (9 डिसेंबर) कतरिना कैफ ‘मिसेस कौशल’ होणार आहे. विकी आणि कतरिना सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेणार आहेत.

Vicky-Katrina Wedding | सलमान खान-अक्षय कुमारने कतरिनाच्या लग्नाला जाणं टाळलं? जाणून घ्या नेमकं कारण...
Vicky-Katrina-Salman

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ आज लग्न बंधनात अडकणार आहेत. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज (9 डिसेंबर) कतरिना कैफ ‘मिसेस कौशल’ होणार आहे. विकी आणि कतरिना सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेणार आहेत. या लग्नाला मित्रपरिवार आणि काही बॉलिवूड सेलिब्रिटी कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत. मात्र, सलमान खान या लग्नाला उपस्थित राहणार नाही. तर, आता समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारही या लग्नाचा भाग होणार नाहीय.

रिपोर्ट्सनुसार, सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह विकी-कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार होता. पण आता तो कतरिनाच्या लग्नात सहभागी होणार नसल्याची पुष्टी झाली आहे. सलमान आज रियाधला जात असताना विमानतळावर स्पॉट झाला होता. त्याचवेळी अक्षय कुमारही रियाधला पोहोचला आहे. त्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. जे पाहून हे दोन्ही कलाकार विकी-कतरिनाच्या लग्नाला जाणे टाळत आहेत, असे म्हणता येईल.

विमानतळावर दिसला सलमान!

नुकताच सलमान खान विमानतळावर स्पॉट झाला होता. जिथे त्याने फोटोग्राफर्सना पोजही दिल्या. सलमान रियाधला रवाना झाला आहे, जिथे तो एका ‘दबंग’ टूरचा भाग असणार आहे. गुरुवारी सकाळी सलमान कलिना विमानतळावर दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

सलमान खानची बहीणही सहभागी होणार नाही!

या लग्नाला सलमान खानसोबत त्याच्या बहिणीही सामील होणार नाहीत. अर्पिता खानने ETimes शी खास संवाद साधताना म्हटले होते की, जर तिला निमंत्रण पत्रिका मिळालेलीच नसेल, तर ती लग्नाला कशी उपस्थित राहू शकते.

सात फेऱ्यांना उरलेयत अवघे काही तास!

वृत्तांवर विश्वास ठेवला तर विकी-कतरिना आज दुपारी सात फेरे घेणार आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार, आज दुपारी 3.30 ते 3:45 पर्यंत फेऱ्यांचा मुहूर्त आहे. लग्नाच्या मंडपाचीही खास सजावट करण्यात आली आहे. मंदिरासमोर हा मंडप बांधण्यात आला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटीही झाले सामील!

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला बॉलिवूड सेलेब्सही हजेरी लावणार आहेत. कोरोना परिस्थिती पाहता केवळ 120 पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या लग्नात सहभागी होण्यासाठी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही राजस्थानला पोहोचले आहेत. कबीर खान, मिनी माथूर, गुरदास मान आणि शर्वरी वाघ राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. आता आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटी राजस्थानला पोहोचू शकतात. कारण अजून पाहुण्यांची यादी समोर आलेली नाही, त्यामुळे लग्नाला नेमकं कोण येणार हे सांगता येत नाही. दरम्यान पाहुण्यांच्या यादीत करण जोहर, फराह खान यांचाही समावेश आहे.

हेही वाचा :

Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला ‘आर्याचा’ थरारक प्रवास

Happy Birthday Shatrughan Sinha | …जेव्हा होणाऱ्या सासूने शत्रुघ्न सिन्हांसोबत लेकीचं लग्न लावण्यास नकार दिला!

‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली


Published On - 12:37 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI