AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट-अनुष्का व्यतिरिक्त या स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त; आश्रमात जातात ‘हे’ सेलिब्रिटी

प्रेमानंद महाराजांवर सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींचीही श्रद्धा आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात जातात.  त्यातील विराट-अनुष्का तर सर्वांनाच माहित आहे. त्यांना अनेकदा त्यांच्या आश्रमाला भेट देताना पाहिलं आहे. पण यांच्याव्यतिरिक्त असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे प्रेमानंद महाराजांकडे आशीर्वाद घ्यायला जातात.

विराट-अनुष्का व्यतिरिक्त या स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त; आश्रमात जातात 'हे' सेलिब्रिटी
Bollywood Celebs Visit Premanand Maharaj Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 17, 2025 | 4:05 PM

प्रेमानंद महाराजांचे भक्त हे देशभर आहेत. सामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीही प्रेमानंद महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यात पहिलं नाव तर नक्कीच विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं येतं. अनेकदा हे आपण पाहतो की, अनुष्का शर्मा आणि विराट हे प्रेमानंद महारांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमाला भेट देतच असतात. विराटने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर देखील विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनात गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनेक स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त 

पण अनुष्का शर्मा आणि विराट कोहली व्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त असून दर्शनासाठी पोहोचले आहेत. यामध्ये अभिनेता आशुतोष राणाही प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी पोहोचला आहे. ‘छवा’ चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्याने त्याच्या आश्रमाला भेट दिली होती. या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो महाराजांशी बोलताना दिसला.

मिका सिंगही आहे महाराजांचा भक्त

राधा केली कुंज प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी बॉलिवूड गायक मिका सिंग गेला होता. मिकाने त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीदरम्यान, मिकाने राधा नाम-जपही गायलं. गायक बी प्राक देखील प्रेमानंद महाराजांचा भक्त असून तोही त्यांच्या दर्शनासाठी जाते. बी प्राक यांनीही कीर्तनात भाग घेतला. त्यांनी गायलेले राधानामाचे गीतही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बी प्राक यांनीही प्रेमानंद महाराजांचे मार्गदर्शन घेतले होते.

‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्यानेही घेतले होते महाराजांचे आशीर्वाद

अभिनेता आशुतोष राणाही प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी पोहोचला आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्याने त्याच्या आश्रमाला भेट दिली होती. या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो महाराजांशी बोलताना दिसला.

हेमा मालिनी ते द ग्रेट खलीनेही घेतलं आहे महाराजांचे दर्शन

ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी देखील वृंदावन येथील आश्रमाला भेट देतात.नुकतीच त्यांनीही महाराजाचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या आश्रमाला भेट दिली. त्यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. अभिनेते आणि नेते रवी किशन यांनीही प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. त्यांनी देखील त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर कुस्तीगीर द ग्रेट खली वृंदावनत येऊन गेले आहेत. यावेळी त्यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्याच्या समस्या महाराजांसोबत शेअरही केल्या आणि खाजगी संभाषणांमध्ये भाग घेतला.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.