बोनी कपूर यांनी लेकीसाठी केलीया ‘या’ तरुणाची निवड, स्वतःच केलाय मोठा खुलासा

Janhvi Kapoor | बोनी कपूर यांनी लेकीसाठी शोधलंय उत्तम स्थळ... कपूर कुटुंबात वाजणार सनई-चौघडे, कोण असेल जान्हवीचा पती? जान्हवी कपूर हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना सर्वत्र उधाण... लेकीच्या होणाऱ्या पतीबद्दल बोनी कपूर यांचं मोठं वक्तव्य...

बोनी कपूर यांनी लेकीसाठी केलीया 'या' तरुणाची निवड, स्वतःच केलाय मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 10:58 AM

अभिनेत्री जान्हवी कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून जान्हवी उद्योजक शिखर पहाडिया याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जान्हवी हिने शिखर याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला होता. शिखर आणि जान्हवी एमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाहीतर, कपूर कुटुंबियांसोबत देखील शिखर याला अनेकदा स्पॉट करण्यात आलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी लेकीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला आहे.

बोनी कपूर म्हणाले, ‘शिखर मला प्रचंड आवडतो. तो जेव्हा जान्हवीसोबत नव्हता तेव्हापासून मी त्याला ओळखत आहे. मी आणि शिखर मित्र आहोत. पण आता काही वर्षांपासून शिखर – जान्हवी एकत्र आहेत. जेव्हा जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हा माला खात्री होती की शिखर कधीच जान्हवीचा एक्स-बॉयफ्रेंड होऊ शकत नाही. मला माहिती होतं दोघे कायम एकत्र राहतील. शिखर कधीच जान्हवीला सोडून जाणार नाही. दोघांमध्ये वाद झाले तरी, शिखर पुन्हा जान्हवीकडेच येईल. मला माहिती दोघांचं नातं आयुष्यभरासाठी आहे.’

‘जान्हवी – शिखर यांच्यामध्ये मैत्री आहे… प्रेम तर दोघांमध्ये प्रचंड आहे… माझ्यासाठी शिखर कायम कोणत्याही प्रसंगी धावत येतो… जान्हवी, खुशी, अर्जुन, अंशुला यांच्यासोबत शिखरचे चांगले संबंध आहेत… सगळ्यांना शिखर आवडतो. जेव्हा पापाराझींसमोर पोज देण्याची वेळ येते तेव्हा शिखरला आवडत नाही…’ असं देखील बोनी कपूर म्हणाले.

बोनी  कपूर यांनी शिखर याच्यासोबत असलेल्या नात्याला परवानगी दिल्यानंतर जान्हवी कधी लग्न बंधनात अडकणार.. अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बोनी कपूर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात कधील सनई – चौघडे वाजणार या प्रतीक्षेत चाहते आहेत.

जान्हवी आणि शिखर यांचं रिलेशनशिप

जान्हवी आणि शिखर गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी आवडते. जान्हवी हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये देखील शिखर याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. चाहते आता दोघांना लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत आहेत.

Non Stop LIVE Update
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.