AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सून म्हणून आलीस आणि वेश्या होऊन…, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘या’ सिनेमामुळे उडालेली सर्वत्र खळबळ

दिवंगत दिग्दर्शक बी.आर. चोप्रा दिग्दर्शित असा एक सिनेमा ज्याबद्दल डिस्ट्रीब्यूटर्समध्ये देखील भीती निर्माण झाली होती. सिनेमाची घोषणा करताच इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर, अनेक डिस्ट्रीब्यूटर्स पत्र लिहित म्हणालेले, 'तुम्ही आम्हाला संपवत आहात का? आपण सर्व मरुन जाऊ...

सून म्हणून आलीस आणि वेश्या होऊन..., प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या 'या' सिनेमामुळे उडालेली सर्वत्र खळबळ
| Updated on: Apr 23, 2026 | 9:51 AM
Share

‘महाभारत’ या मालिकेबद्दल आज काहीच वेगळं सांगण्याची गरज नाही. सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शत बलराज चोप्रा म्हणजेच बी.आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका आजही चर्चेत असते. बी.आर. चोप्रा यांनी फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही तर, मनोरंजनाला सामाजिक मुद्द्यांची जोड देखील दिली. त्यांची कारकीर्द सामाजिक विचार, अर्थपूर्ण कथा आणि धाडसी विषयांनी भरलेली होती. जरी ते आता या जगात नसले तरी, त्यांचे सिनेमे आणि ‘महाभारत’ ही टीव्ही मालिका लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. 1955 मध्ये चोप्रा यांनी ‘बीआर फिम्स’ नावाने प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती केली आणि त्यांनी सिनेमांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांपर्यंक सामाजिक संदेश पोहोचवण्याचं काम केलं.

‘नया दौर’, ‘गुमराह’, ‘कानून’, ‘हमराज’, ‘निकाह’, ‘कर्म’ यांसारख्या बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडलं. ‘भूतनाथ’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला… पण 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘साधना’ सिनेमाने सर्वत्र खळबळ उडाली होती. सिनेमाच्या कथा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्यावर आधारित होती. सिनेमात अभिनेत्री वैजयंतीमाला यांनी चंपा… या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. ती मोहन (सुनील दत्त) नावाच्या एका कॉलेज प्राध्यापकाच्या प्रेमात पडते.

या सिनेमात वेश्यांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज यावर भाष्य करण्यात आलं होतं. सिनेमाच्या घोषणेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. अनेक डिस्ट्रीब्यूटरनी चोप्रा यांनी पत्र लिहून विचारलं, “तुम्ही हे काय करत आहात? आम्ही सगळे मरून जाऊ.”

याबद्दल स्पष्टीकरण बी.आर. चोप्रा यांनी एका मुलाखतीत दिलेलं. अनेकांनी चोप्रा यांना समजावलं की, आतापर्यंत अनेकांनी वेश्यांच्या आयुष्यावर सिनेमे बनवले आहेत आणि ते फ्लॉप ठरले… ‘नर्तकी’, ‘राज नर्तकी’, ‘पूर्णिमा’ आणि ‘सेवा सदन’ यांसारख्या सिनेमांकडे सर्वांना पाठ फिरवली. एका डिस्ट्रीब्यूटरने बी. आर. चोप्रा यांना थेट विचारलं होतं की, ‘चार सिनेमे फ्लॉप ठरले आहे तुम्हाला वाटतं तुमचा सिनेमा चालेल?’

यावर बी, आर चोप्रा शांततेत म्हणालेले, ‘जेव्हा मी माझा पहिला सिनेमा बनवला तेव्हा सुद्धा मला माहिती नव्हतं, की माझा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही. मला कथा आवडली म्हणून मी सिनेमा केला. या सिनेमाची कथा मला आवडली म्हणून मी सिनेमा करत आहे… ‘

तू या घरची सून म्हणून आली आहेस, वेश्या म्हणून बाहेर जाऊ शकत नाही.

मूळ कथेचा शेवट वेगळा होता, ज्यात मंदिरात प्रवचन ऐकल्यानंतर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचे विचार बदलतात, परंतु चोप्रा यांना वाटले की, यामुळे सामाजिक पैलू नाहीसा होईल. त्यांनी लेखक पंडित मुखराम शर्मा यांना सांगितलं, शेवट असा असावा की आई आपल्या मुलीचा हात धरून म्हणेल, “तू या घरात सून म्हणून आली आहेस, वेश्या म्हणून जाऊ शकत नाहीस.” हाच शेवट ठेवण्यात आला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मराठा मंदिरमध्ये महिलाची गर्दी होण्यास सुरूवात झाली.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात