AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2021 | अर्थसंकल्पात बॉलिवूडला भोपळा, मनोरंजन क्षेत्र महागणार?

कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) आज सादर केला आहे.

Budget 2021 | अर्थसंकल्पात बॉलिवूडला भोपळा, मनोरंजन क्षेत्र महागणार?
| Updated on: Feb 01, 2021 | 2:21 PM
Share

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) आज सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आज या अर्थसंकल्पामध्ये जवळपास प्रत्येक उद्योगासाठी काहीतरी जाहीर केले. पण या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणात त्यांनी, मनोरंजन क्षेत्रासाठी काहीच जाहिर केले नाही. अर्थमंत्री यांनी मनोरंजन क्षेत्राबद्दल एक शब्दही काढला नाही. (Budget 2021 | Bollywood has nothing in the budget, the entertainment sector will be expensive)

कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीला (film industry) खूप त्रास सहन करावा लागला आहे. बर्‍याच मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीजची वाट गेल्या काही दिवसांपासून बघत आहेत त्यामुळे चित्रपट निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर चित्रपटगृहाचे मालकही दिवाळखोरीत आले आहेत. अशा परिस्थितीत मनोरंजन क्षेत्राला आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या.

जीएसटी आणि अर्थसंकल्पामध्ये करमणूक कर कमी करण्याची मागणी केली देखील काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे. जीएसटी आणि बजेटमध्ये करमणूक कर कमी करण्याची मागणी एंटरटेनमेंट इंडस्ट्री गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. करमणूक कराचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशात थेट पडतो. जेव्हा चित्रपटाची तिकिटे महाग होतात त्यावेळी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरत नाहीत. ज्याचा परिणाम थेट चित्रपटांवर होतो.

संबंधित बातम्या :

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”

Budget 2021 | निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यात मनोरंजन जगतासाठी काय?

Vamika | विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक!

(Budget 2021 | Bollywood has nothing in the budget, the entertainment sector will be expensive)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.