AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार

सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही घोळ झाला का? असा आरोप होत होता. पण यानंतर शवविच्छेदन आणि फॉरेंसिक रिपोर्ट हा सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्यात आला. आता हा सीबीआयकडे पाठवण्यात आला आहे.
| Updated on: Aug 21, 2020 | 11:40 AM
Share

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेली सीबीआय टीम तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा घरात फासावर लटकवून सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. (CBI to recreate Sushant Singh Rajput Suicide Crime Scene)

सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमकं अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय खातरजमा करणार आहे. सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.

फॉरेंसिक टीम सीबीआयसोबत असेल. पोस्टमार्टेम, विसेरा, घरात उपस्थित असलेले चार साक्षीदार या सगळ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील ऊलवे इथे असलेल्या सुशांत सिंह याच्या ऑफिसलाही सीबीआय टीम भेट देणार आहे.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती सीबीआयच्या ताब्यात आहे. शौविकला सीबीआयच्या गेस्ट हाऊसवर बोलावून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर कुक नीरज यालाही सीबीआयने चौकशीसाठी बोलावले. सुशांतची डायरी, मोबाइल, लॅपटॉप मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुपूर्द करण्यात आले आहे.

हेही वाचा : प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीचे ‘कथित’ व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयचं पथक मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहे. सीबीआय आणि मुंबई पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस सुवेज हक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (CBI to recreate Sushant Singh Rajput Suicide Crime Scene)

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर हे सीबीआय पथकाचे प्रमुख असतील.

महिला आरोपींची चौकशी करण्यात अडचण उद्भवू नये म्हणून गगनदीप गंभीर आणि नुपूर प्रसाद यांनाही चार सदस्यीय एसआयटीत समाविष्ट करण्यात आले आहे. तर अनिल कुमार यादव हे तपास अधिकारी असतील.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडून फेरयाचिका दाखल केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस सीबीआयला पूर्णपणे सहकार्य करतील, असं सांगण्यात आलं आहे.

(CBI to recreate Sushant Singh Rajput Suicide Crime Scene)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.