AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीने पूर्व पतीची केली आरती, सासूचेही जोरदार स्वागत… कधीकाळी एकमेकांना दिल्या होत्या धमक्या

टीव्हीवर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अगदी कमी वयातच आपल्या करिअरला सुरुवात केली. तर काही अभिनेत्रींचे कमी वयातच लग्न झाले, पण ते फार काळ टिकले नाही. आज अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट आम्ही सांगणार आहोत, जिने बॉलिवूडच्या सुपरस्टारच्या भावाला घटस्फोट दिला आहे. पण आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या पूर्व पतीची आरती करताना दिसत आहे. शिवाय, एक्स सासूचीही ढोल-तशावर घरात एण्ट्री होताना दिसत आहे.

अभिनेत्रीने पूर्व पतीची केली आरती, सासूचेही जोरदार स्वागत... कधीकाळी एकमेकांना दिल्या होत्या धमक्या
Charu AsopaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 27, 2025 | 9:19 AM
Share

टीव्हीवर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे करिअर यशस्वी झाले, पण वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत राहिले. तर काही अभिनेत्री अशा आहेत, ज्या ना टीव्हीवर आपले करिअर यशस्वी करू शकल्या, ना त्यांचे नाते टिकवू शकल्या. आज अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट आम्ही सांगणार आहोत. जी कधीकाळी आपल्या ऑनस्क्रीन भावावरच मनापासून प्रेम करू लागली होती. इतकेच नाही, तर त्या अभिनेत्रीचा त्याच्याशी साखरपुडाही झाला होता. पण नंतर त्यांचे नाते तुटले. होय, टीव्ही अभिनेत्री चारू असोपा बराच काळ चर्चेत आहे. ती आपल्या मुलीसह बीकानेरमध्ये राहते आहे. पती राजीव सेनपासून घटस्फोटानंतर तिने नवीन घर घेतले आहे. शिवाय, कपड्यांचा (साड्यांचा) व्यवसायही करत आहे.

खरंतर, चारू असोपाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एक्स पती राजीव सेनचे आरती करुन घरात स्वागत करताना दिसत आहे. यावेळी राजीवसोबत त्याची आई देखील दिसत आहे. ज्यांच्यावर चारूने प्रेमाचा वर्षाव केला आणि ढोल-तशावर नव्या घरात एण्ट्री केली. आता लोकांचे म्हणणे आहे की, दोघे पुन्हा एकत्र येत आहेत का?

वाचा: आदेश बांदेकरांच्या लेकासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पूजा बिरारीची प्रतिक्रिया, म्हणाली ‘ज्यांना माहीत आहे…’

View this post on Instagram

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

चारूने केली पूर्व पतीची आरती

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा बराच काळ अभिनयापासून दूर आहे. याचे कारण आहे तिची मुलगी. तिची काळजी घेण्यासाठी तिने कपडे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. एकटीने राहूनच ती मुलीचा सांभाळ करत आहे. काही काळापूर्वी तिने नवीन घरही घेतले होते. अभिनेत्रीचे स्वतःच्या नावाने यूट्यूब चॅनेलही आहे, ज्याला ४.८३ लाख सब्सक्रायबर्स आहेत. आपल्या व्ह्लॉगमध्ये तिने दाखवले की, ती आपल्या नव्या घरात गणपती बाप्पा आणत आहे. यासाठी तिने सर्व तयारी केली होती. शिवाय, या खास प्रसंगी तिने पूर्व पती आणि सासूलाही घरी बोलावले.

खरंतर, चारू असोपाचे सुष्मिता सेनच्या भावाशी लग्न झाले होते. २०१९ मध्ये एकत्र आलेले हे जोडपे २०२३ मध्ये वेगळे झाले. तरीही, त्यांना एक मुलगी आहे. चारूचे राजीवच्या आईसोबत चांगले संबंध आहेत. आता तिने गणपती उत्सवासाठी एक्स पतीला बोलावले. शिवाय, सासूचेही जोरदार स्वागत केले, ज्या तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसल्या. आता लोकांनी चारूचे खूप कौतुक केले आहे. लोकांनी कमेंट करत लिहिले की, घटस्फोटानंतरही एक्स पतीच्या घरच्यांचा इतका सन्मान करणे ही मोठी गोष्ट आहे. तर राजीवही मुलीला भेटून आनंदी दिसत आहे. त्याने व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.

एकमेकांना दिल्या होत्या धमक्या

खरंतर, चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या घटस्फोटानंतर खूप गोंधळ झाला. दोघांमध्ये सोशल मीडियावरही शीतयुद्ध झाले होते. इतकेच नाही, तर राजीव सेनने धमकी दिली होती की, तो कायदेशीर कारवाई करेल म्हणून. शिवाय, मुलगी जियानाचे ब्रेनवॉश केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच, चारू त्यांना मुलीला भेटू देत नाही, असेही ते म्हणाले होते.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?