
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. या महत्त्वाच्या क्षणांसाठी तयारीसुद्धा अत्यंत जोमाने केली जाते.

लग्नातील लूक खास असावा यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू होते. अनेकदा सोशल मीडियावर आपण ब्रायडल लूकचे फोटो सर्च करत असतो.

लग्नातील वधूच्या लूकसाठी तुम्ही मराठी सेलिब्रिटींचेही लूक फॉलो करू शकता. विविध मराठी अभिनेत्रींचा त्यांच्या लग्नातील हा खास लूक विशेष चर्चेत असतो.

साडी, साडीचा रंग, हेअरस्टाईल, दागिने अशा सर्व गोष्टींची कल्पना तुम्हाला कदाचित हे सेलिब्रिटींचे फोटो पाहून येऊ शकेल.

शिवाय नेहमीसारखी हेअरस्टाईल, नेहमीसारखी साडी आणि दागिने परिधान करण्याऐवजी, थोडा वेगळा ट्रेंड ट्राय करायचा असेल तर तुम्ही या अभिनेत्रींचा लग्नातील लूक सेव्ह करून ठेवू शकता.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनीलचा लग्नातील हा खास लूक

अभिनेत्री मिताली मयेकरने पुण्यातील ढेपेवाडा याठिकाणी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरशी लग्नगाठ बांधली. यावेळी तिने केलेलं हे खास फोटोशूट

गायिका जुईली जोगळेकर आणि गायक रोहित राऊत यांच्या लग्नातील हा खास क्षण

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे.

नऊवारी साडी आणि दागिन्यांमध्ये अभिज्ञाचा लग्नातील हा खास फोटो