गणोजी, कान्होजी शिर्के फितूर होते का? ‘छावा’ला वंशजांकडून विरोध का? शिर्केंबद्दल इतिहास काय म्हणतो?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात दाखवलेल्या चित्रणाविरोधात शिर्के घराणं आक्रमक झालं आहे. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी फितुरी केल्याचं चित्रण यात दाखवण्यात आलं आहे. याबद्दलच्या घडामोडी आणि इतिहास काय म्हणतो, हे जाणून घेऊयात..

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आजवर बरेच चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. त्यापैकी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने जगभरात विशेष चर्चा घडवून आणली आहे. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर इतका गाजतोय की, प्रदर्शनाच्या अवघ्या 14 दिवसांत ‘छावा’च्या कमाईचा आकडा 400 कोटींच्या पार पोहोचला आहे. एकीकडे प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटावर, त्यातील कलाकारांवर आणि दिग्दर्शनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या कथानकावरून वादसुद्धा निर्माण झाला आहे. तसं पाहिल्यास एखाद्या ऐतिहासिक चित्रपटावरून वाद निर्माण झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ऐतिहासिक कथानक असलेले चित्रपट आणि वाद हे भारतात जणू समीकरणच बनलं आहे. त्यामुळे ‘छावा’सुद्धा त्याला अपवाद ठरला नाही. या चित्रपटात गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिकांबद्दल दाखवण्यात आलेल्या कथानकावर आक्षेप घेण्यात आला आहे. हा आक्षेप शिर्केंच्या वंशजांनी घेतला आहे. गणोजी आणि कान्होजी कोण होते, ‘छावा’ या चित्रपटात...