AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devraj Patel Death | युट्युबर कॉमेडियन देवराज याचं अपघाती निधन, सोशल मीडियावर शोककळा

Devraj Patel Died | देवराज पटेल हा त्याच्या "दिल से बुरा लगता है" या वाक्यामुळे नेटकऱ्यांचा लाडका झाला होता. देवराजचं हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच गाजलं होतं.

Devraj Patel Death  | युट्युबर कॉमेडियन देवराज याचं अपघाती निधन, सोशल मीडियावर शोककळा
| Updated on: Jun 26, 2023 | 10:46 PM
Share

रायपूर | सोशल मीडियावर दररोज नेटकऱ्यांना वेगवेगळा कंटेट पाहायला मिळतो. अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर्स आपल्या व्हीडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र काही सोशल मीडिया इन्फ्लुयएंसर्स नेटकऱ्यांना आपल्याकडे सहजपणे ओढून घेतात. त्यापैकी एक म्हणजे युट्युबर कॉमेडियन देवराज. देवराज त्याच्या कॉमेडीने घराघरात पोहचला होता. देवराज नेटकऱ्यांचा लाडका झाला होता. देवराज याचं “दिल से बुरा लगता है”, वाक्य नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं. मात्र देवराजच्या चाहत्यांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

देवराज पटेल याचं छत्तीसगडमध्ये अपघाती निधन झालं आहे. लाभांडीच्या आसपास देवराज याचा अपघात झाला. भरधाव असलेल्या ट्रकने बाईकला मागील बाजूने धडक दिली.या धडकेत देवराजचं जागीच निधन झालं. देवराजची अकाळी एक्झिट ही मनाला चटका लावणारी आहे. देवराजच्या निधनावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केलंय.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून शोक व्यक्त

भूपेश बघेल यांचं ट्विट

“दिल से बुरा लगता है” या वाक्याने अनेकांमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा, आपल्या सर्वांना हसवणारा देवराज पटेल आपल्याला सोडून गेलाय. देवराजने कमी वयात खूप काही मिळवलं. देवराजच्या कुटु्ंबियांना आणि चाहत्यांना त्याचा निधनाचं दु:ख सहन करण्याची ताकद देवोत, ओम् शांति:, असं ट्विट मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी देवराज पटेल याने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली होती. भूपेशने या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत एक व्हीडिओ बनवला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. “छत्तीसगडमध्ये 2 जण फेमस आहेत, एक मी आणि मोर काका”, असं देवराज म्हणाला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांना स्वत:ला हसू आवरता आलं नव्हतं.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे देवराजला त्याच्या मृत्यूची चूणुक लागली होती की काय, असं आता म्हटलं जात आहे. त्याचं कारण आहे तो भूपेशचा अखेरचा व्हीडिओ. भूपेशने अपघाताच्या 4 तासांआधी एक व्हीडिओ पोस्ट केला होता. भूपेशने या व्हीडिओत सर्वांना बाय केलं. यामुळेच भूपेशला त्याचा मृत्यू दिसला होता का, अशी चर्चा रंगली आहे.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...