ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरून सोनू सूदने चीनला सुनावले खडे बोल, चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया…

सोनू सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच त्यांनी ट्विट करून चीनची चांगलीच शाळा घेतली होती. चीनमुळे भारतातील लोकांचे नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले होते.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरून सोनू सूदने चीनला सुनावले खडे बोल, चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया...
सोनू सूद
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 11:58 AM

मुंबई : लॉकडाऊनमध्ये ‘मसीहा’ म्हणून पुढे आलेल्या अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने आतापर्यंत कोट्यवधी लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी त्याने हजारो लोकांना लॉकडाऊनदरम्यान आपआपल्या घरी जाण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या अन्न-पाण्याची देखील व्यवस्था घेतली. सोनू सूद अजूनही लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे. तो या काळात कोणतीही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. सोनू सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अलीकडेच त्यांनी ट्विट करून चीनची चांगलीच शाळा घेतली होती. चीनमुळे भारतातील लोकांचे नुकसान होत असल्याचे त्याने म्हटले होते. आता या प्रश्नावर चीनकडून उत्तर आले आहे (China representative gives reply to Sonu Sood tweet oxygen concentrators).

अभिनेता सोनू सूद यांनी ट्विट केले की, ‘आम्ही हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. चीनने आमच्या बर्‍याच वस्तूंवर बंदी घातली हे फार वाईट आहे, ज्यामुळे भारतात प्रत्येक मिनिटाला लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आम्ही आपणास विनंती करतो की, आम्हाला ही उपकरणे आणण्यास मदत करा जेणेकरुन आम्ही लोकांचे प्राण वाचवू शकू.’ या ट्विटमध्ये सोनू सूदने चिनी दूतावासाला टॅग केले होते.

सोनू सूद यांच्या या ट्विटला आता चिनी राजदूताने प्रत्युत्तर दिले आहे. त्याने ट्विट केले की, ‘सोनू सूद मी तुमची माहिती लक्षात घेत आहे. कोरोना काळामध्ये भारताला मदत करण्यासाठी चीन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’ चीनी राजदूताच्या या ट्विटला सोनू सूद यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्याने लिहिले की, ‘उत्तराबद्दल धन्यवाद, ही समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या कार्यालयाशी संपर्क साधत आहे.’

पाहा ट्विट

 (China representative gives reply to Sonu Sood tweet oxygen concentrators)

सोनूची सरकारला विशेष विनंती

अभिनेता सोनू सूद यांनी अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारात आपले पालक गमावलेल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला विशेष विनंती केली गेली आहे. व्हिदिओ सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘या कोरोना साथीच्या काळात ज्यांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत, अशा लोकांना आपण सर्वांनी एकत्र यायला मदत केली पाहिजे.’

कोरोनावर केली मात

अलीकडेच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. त्याने एका आठवड्यातच कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर एका आठवड्यानंतर पुन्हा एकदा त्याने ट्विट करत आपण कोरोना निगेटिव्ह झाल्याची बातमी दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. दिवस रात्र तो लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे.

(China representative gives reply to Sonu Sood tweet oxygen concentrators)

हेही वाचा :

कोरोनामुळे ‘फत्तेशिकस्त’चा ‘मावळा’ गमावला, दिग्पाल लांजेकरने वाहिली श्रद्धांजली

मलाही तुमच्या इतकेच मृतदेह आवडतात, ‘तिसरी लाट’ चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या, दिग्दर्शकाचा पंतप्रधान मोदींना उपरोधिक टोला

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.