कोरोनामुळे ‘फत्तेशिकस्त’चा ‘मावळा’ गमावला, दिग्पाल लांजेकरने वाहिली श्रद्धांजली

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय विध्वंसक ठरली आहे. दररोज हजारो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. अनेक लोक या विषाणूला बळी पडत आहेत.

कोरोनामुळे ‘फत्तेशिकस्त’चा ‘मावळा’ गमावला, दिग्पाल लांजेकरने वाहिली श्रद्धांजली
नवनाथ गायकवाड
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 11:16 AM

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय विध्वंसक ठरली आहे. दररोज हजारो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. अनेक लोक या विषाणूला बळी पडत आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांनी देखील आपला जीव गमावला आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ सारख्या चित्रपटांत झळकलेले अभिनेते नवनाथ गायकवाड (Navnath Gaikwad) देखील कोरोना विषाणूला बळी पडले आहेत. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला (Fatteshikast fame Actor Navnath Gaikwad passes away due to corona).

‘फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..’, अशी पोस्ट लिहिती ‘फत्तेशिकस्त’चे लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पाहा दिग्पाल लांजेकरांची पोस्ट

फर्जंद आणि फत्तेशिकस्त मध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.. ??

Posted by Digpal Lanjekar on Saturday, 1 May 2021

काहीच दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’च्या अभिनेत्याचे निधन

सध्या देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्णांचा जीव जातोय. अशात कलाकारांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवरही शोकाकळा पसरली आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेते अमोल धावडे (Amol Dhavade) यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. अवघ्या 15 दिवसात झालेल्या कोरोना संक्रमणानं त्यांचा मृत्यू झाला होता. अभिनेते दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. अभिनेते अमोल धावडे हे प्रवीण तरडे यांचे जवळचे मित्र होते. ‘देऊळबंद’ , ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटांमध्ये ते झळकले होते. इतकेच नव्हे तर प्रवीण तरडेंचा आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही त्यांची भूमिका असल्याची माहिती दिली होती (Fatteshikast fame Actor Navnath Gaikwad passes away due to corona).

महाराष्ट्रात कोरोनाची सद्य स्थिती

राज्यात मागील 24 तासांत तब्बल 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Maharashtra Corona Update) आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 47 लाख 22 हजार 401 वर पोहोचला आहे. यापैकी 39 लाख 81 जार 685 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या 24 तासांत 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं जरी असलं तरी बाधितांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब आहे. राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 55 ते 70 हजारांच्या दरम्यान स्थिर आहे. कोरोना हा गुणाकार करतो. मात्र, हा गुणाकार थोपवण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आलं आहे. याशिवाय राज्यात कडकडीत लॉकडाऊन असल्याने परिस्थितीत थोडीफार नियंत्रणात येताना दिसत आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा आजही नियंत्रणात आलेला नाही. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होतोय. रुग्णांचा मृत्यू आकडा कमी करणं हे सरकार आणि प्रशासनापुढील मोठं आव्हान आहे.

(Fatteshikast fame Actor Navnath Gaikwad passes away due to corona)

हेही वाचा :

Death Anniversary | संजयला ड्रग्जची सवय नर्गिसनी सुनील दत्तपासून लपवली गोष्ट, मृत्यूनंतर समोर आलं कारण…

Hina Khan : वडिलांच्या निधनानंतर आईला भेटणंही मुश्कील, अभिनेत्री हीना खानची हतबलता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.