AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंकी पांडेला पोलिसांनी विमानतळावरच पकडलं, ओरडून ओरडून थकला अन् अचानक… काय झालं?

आपल्याकडे बॉलिवूडचा एखादा अभिनेता सार्वजनिक ठिकाणी दिसला तर त्याला पाहण्यासाठी पाच पन्नास लोक सहज जमा होतात. त्याच्यासोबत फोटो काढण्याची चढाओढ सुरू होते. एवढी क्रेझ या कलाकारांची असते. पण चंकी पांडेला मात्र याच्या उलट अनुभव आला आहे. विमानतळावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नेमकं काय घडलं होतं?

चंकी पांडेला पोलिसांनी विमानतळावरच पकडलं, ओरडून ओरडून थकला अन् अचानक... काय झालं?
Chunky Pandey
| Updated on: Jun 06, 2025 | 6:46 PM
Share

फिल्मी कलाकारांच्या वाट्याला कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतच असतात. कधी चाहत्यांमुळे तर कधी स्वत:च्या अतिघाईमुळे हे कलाकार अडचणीत येतात. अभिनेता चंकी पांडे याच्या वाट्यालाही असाच एक किस्सा आला आहे. चंकीला विमानतळावर पोलिसांनी पकडलं. पकडण्यात घेण्यामागचं कारणही तसंच होतं. चंकीने पोलिसांना समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न केला. सांगून सांगून थकला. पण काहीच उपयोग झाला नाही. नंतर मात्र अचानक…

अक्षय कुमारचा हाऊसफुल 5 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात एकूण 19 कलाकारांनी काम केलंय. ज्या गोष्टीसाठी हाऊसफुल ओळखली जाते, त्या सर्व गोष्टी या सिनेमात आहेत. म्हणजे मोठी स्टारकास्ट, लॅविश सेट्स आणि स्लॅपस्टिक कॉमेडी. या सिनेमात काही नवीन तर काही जुने अभिनेतेही आहे. म्हणजे नाना पाटेकर, रितेश देशमुख, अक्षय कुमार, जॅकलीन, जॉनी लिव्हर आणि चंकी पांडे अशी जुन्या नव्या कलाकारांची भट्टी या सिनेमात जमली आहे. चंकी तर या सिनेमात सुरुवातीपासूनच आहे. त्याचं आखिरी पास्ता हे कॅरेक्टर तुफान हिट झालं आहे.

चंकी आणि हाऊसफुल फ्रेंचाइजचं नातं जुनच आहे. म्हणजे 2010 पासून आहे. जेव्हापासून हाऊसफुल सिनेमा बनला तेव्हापासून चंकी या सिनेमाचा एक भाग राहिला आहे. हाऊसफुलने त्याला नवीन ओळख दिली आहे. पण एकदा त्याला या सिनेमामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. हाऊसफुलमुळे चंकी मॉस्कोच्या तुरुंगात जाता जाता वाचला होता. हा किस्सा अफलातून आहे.

विमानतळावरच पकडलं

चंकी शुटिंग संपवून अॅमस्टरडॅम विमानतळावर आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चंकी ड्रग्स पेडलर असल्याचं पोलिसांना वाटलं. चंकीचा लूक तसाच होता. तो सेटवरून थेट विमानतळावर गेला होता. त्यामुळे त्याने मिश्या काढल्या नव्हत्या. मेकअप तसाच ठेवला होता. पण पोलिसांना मात्र तो गेटअप पाहून तो क्रिमिनल असल्याचं वाटलं आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं. पकडल्यावर पोलिसांना समजता समजता चंकी थकला होता. मी इंडियातील एक मोठा अभिनेता आहे, असं तो वारंवार पोलिसांना सांगत होता. पण पोलीस मात्र काहीही ऐकायला तयार नव्हते.

अन् अचानक

चंकीने पोलिसांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. युट्यूबवरचे त्याचे व्हिडीओही त्याने दाखवले. पण पासपोर्टवर त्याचं असली नाव सुयश पांडे लिहिलेलं होतं. मिशीही लावलेली होती. त्यामुळे पोलिसांना त्याचं म्हणणं पटत नव्हतं. त्यानंतर चंकीने विमानतळावर असलेल्या अनेक भारतीयांशी संवाद साधला. आपण चंकी पांडे आहोत हे पोलिसांना सांगण्याची त्याने विनंती केली. पण त्याच्या लूकमुळे भारतीयांनीही त्याला ओळखलं नाही. त्यामुळे चंकीला चांगलंच टेन्शन आलं होतं. मात्र, एक म्हातारी पुढे आली आणि तिने चंकी पांडेला ओळखलं. हा मोठा अभिनेता आहे. शुटिंगसाठी त्याने असा वेश केल्याचं त्या महिलेने सांगितल्यावर मात्र पोलिसांना पटलं आणि त्यांनी चंकीला सोडून दिलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.