Ramayana : ‘हिंदूंच्या भावनांना ठेच…’ प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’ वादाच्या भोवऱ्यात, रामलीला संघाकडून सक्त ताकीद

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'रामायण' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मागण्यापूर्ण केल्या नाही तर, चित्रपटगृहांच्या बाहेर हजारो कार्यकर्ते विरोध - प्रदर्शन आणि आंदोलन करतील... असा इशारा रामलीला संघाकडून देण्यात आला आहे.

Ramayana : हिंदूंच्या भावनांना ठेच... प्रदर्शनापूर्वीच रामायण वादाच्या भोवऱ्यात, रामलीला संघाकडून सक्त ताकीद
Ramayana
| Updated on: Aug 03, 2026 | 8:52 AM

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, सनी देओल आणि यश स्टारर ‘रामायण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे… सिनेमावरुन वाद सुरु झाले आहे. श्री रामलीला महासंघाने सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि प्रॉडक्शन कंपनीला एक पत्र लिहित चेतावनी दिली आहे. महासंघाचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी मागणी केली आहे की, दिवाळीत ‘रामायण’ सिनेमा देश – विदेशात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी सिनेमा प्रतिनिधिमंडळाला दाखवण्यात यावा. आता यावर दिग्दर्शक आणि निर्माते काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महासंघाचं असं म्हणण आहे की, ‘रामायण’ सिनेमात असे असे अनेक सीन असू शकतात, जे हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे असू शकतील. सिनेमातील वादग्रस्त सीन हटवण्यात आल्यानंतंर सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करु देऊ… पण सिनेमाचे दिग्दर्शकन नितेश तिवारी यांच्याकडून किंवा सिनेमाच्या प्रॉडक्शन हाऊसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

श्री रामलीला महासंघाचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचं विशेष प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी केली आहे. प्रभू श्रीराम, रामायणातील पात्रे किंवा सनातन धर्म यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह चित्रण किंवा संवाद नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी हा सिनेमा महासंघाला विशेष प्रदर्शनाद्वारे दाखवावा, अशी विनंती त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे. अर्जुन कुमार यांनी अशी देखील सक्त ताकीद दिली आहे की, त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर, दिल्लीसह अन्य शहरांमधील चित्रपटगृहांच्या बाहेर हजारो कार्यकर्ते विरोध – प्रदर्शन आणि आंदोलन करतील..

राम संघाने ‘आदिपुरुष’ सिनेमाचं दिलं उदाहण

महासंघाने 2023 मधील ‘आदिपुरुष’ या सिनेमाचं उदाहरण दिलं, जो चुकीच्या चित्रीकरणामुळे अयशस्वी ठरला. अर्जुन कुमार यांनी आठवण करून दिली की, भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या आणि प्रभास व सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमातील अनेक दृश्यांवर सनातन समाज आणि रामलीलेशी संबंधित लोकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्या सिनेमात लंकेचं सोनेरी शहर काळ्या रंगाचं दाखवलं होतं, एवढंच नाही तर, अत्यंत विद्वान रावण आणि त्याचे सैन्य यांना मंगोल आक्रमकांसारखं चित्रित केलं होतं. या तीव्र विरोधाचा परिणाम म्हणून, मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. याच कारणामुळे रामसंघाने ‘रामायण’ सिनेमाचं विशेष प्रदर्शन आयोजित करण्याची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us