रणवीरची चाहत्यांवर उडी आणि चाहते जखमी

रणवीरची चाहत्यांवर उडी आणि चाहते जखमी


मुंबई : अभिनेता रणवीर सिंह याचा ‘गल्ली बॉय’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी मोठ्या प्रमाणात त्याचे प्रमोशन करण्यात येत आहे. रणवीरही मोठ्या उत्साहात या सिनेमाचं प्रमोशन करतो आहे. मात्र त्याची हिच अतिउत्साही वृत्ती त्याच्या अंगलट आली आहे. प्रमोशन दरम्यान परफॉर्म करत असताना त्याने अचानक गर्दीकडे उडी घेतली आणि अपघातास आमंत्रण दिले.

रणवीर हा त्याच्यातील उत्साहीपणासाठीच चर्चिला जातो. तो जिथे जाईल तिथे नेहमी एनर्जेटिक असतो आणि आसपासच्या लोकांनाही आपल्यात सामील करुन घेतो. त्याच्या याच अॅटिट्यूडमुळे तो तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात त्याचं फॅड आहे. तरुणमंडळीतर त्याला अक्षरश: डोक्यावर घेतात. मात्र यावेळी जरा उलटच झालं. ‘गल्ली बॉय’ सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणवीरने अनेकदा चाहत्यांच्या गर्दीत उडी (क्राउड सर्फिंग) घेतली. मात्र यावेळी अशा अचानकपणे घेतलेल्या उडीमुळे त्याचे चाहते जखमी झाले. क्राउड सर्फिंग करताना रणवीरची टायमिंग चुकली. तो उडी घेणार तेव्हा त्याचे चाहते त्याला मोबाईलमध्ये टिपण्यात व्यस्त होते. त्यामुळे तो उडी घेताच चाहत्यांवर पडला आणि त्यामुळे त्याचे चाहते जखमी झाले. यामध्ये काही तरुणीही होत्या.

‘मिड डे’ने आपल्या वृत्तात याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही तरुणी खाली जमीनीवर डोकं पकडून बसल्याचं दिसत आहे.

या प्रकरणानंतर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. काहींनी त्याला बालीशपणा सोडण्याचा सल्लाही दिला. तर कुणी त्याला बेजबाबदार म्हटले. या सर्व टिकांनंतर रणवीरने माफी मागणारे ट्वीट केले, त्याने लिहिले की, “यापुढे मी सावध राहिल. मला प्रेम दिल्याबाबत आणि माझी काळजी केल्याबाबत धन्यवाद.”

VIDEO :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI