AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | “मला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं”; ‘दबंग 3’मधल्या अभिनेत्रीचा सलमान खानवर गंभीर आरोप

"जवळपास 100 जणांच्या युनिटसमोर मला अत्यंत वाईट वागणून मिळाली. त्या 100 जणांपैकी काही लोक मला खूप चांगल्याप्रकारे ओळखायचे. त्या घटनेनंतर मी दहा दिवस नीट झोपूही शकले नाही," असं तिने सांगितलं.

Salman Khan | मला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं; 'दबंग 3'मधल्या अभिनेत्रीचा सलमान खानवर गंभीर आरोप
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2023 | 8:49 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात अभिनेता सलमानविरोधात एका अभिनेत्रीने धक्कादायक आरोप केले आहेत. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने दावा केला आहे की, सलमानच्या बाऊन्सर्सनी तिला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं. सेटवरील जवळपास 100 लोकांसमोर तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. ही संपूर्ण घटना तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सांगितली. या व्हिडीओमध्ये ती घटनेबद्दल सांगताना रडतानाही दिसतेय. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने सलमानच्या ‘दबंग 3’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर ती ‘व्हायरल भाभी’ या नावाने ओळखली जाते.

नेमकं काय घडलं?

सलमानवर आरोप करणारी ही अभिनेत्री एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. हेमा शर्मा असं तिचं नाव आहे. सोशल मीडियावर रडत तिने या घटनेबद्दल सांगितलं आहे. “तुम्ही सुपरस्टार आहात म्हणूनच सर्वांना तुमच्यासोबत चित्रपटात काम करायचं असतं. तुम्ही म्हणता की मुलींचा आदर करा. पण तुम्ही जशी इतरांना वागणूक देता त्यावरूनच समजतंय की तुम्ही महिलांचा किती आदर करता. त्या घटनेनंतर मी पुन्हा कधीच सलमान खानची भेट घेण्याची इच्छा मनात आणली नाही. 2019 मध्ये माझ्यासोबत ती घटना घडली होती”, असं ती म्हणते.

“कुत्र्यासारखं बाहेर ढकललं”

2019 मध्ये ‘दबंग 3’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमाला सलमानची भेट घ्यायची होती. ती पुढे म्हणाली, “मला दबंग 3 मध्ये काम करण्याची खूप इच्छा होती आणि ती संधी मिळण्यासाठी मी खूप मेहनत केली होती. अखेर मला ती संधी मिळाली, पण त्यानंतर जे घडलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. शूटिंग संपल्यानंतर मला सलमान सरांची भेट घ्यायची होती. त्यासाठी मी पंडित जनार्दन यांच्याशी संपर्क साधला होता. ते बिग बॉस या शोमध्येही आले होते. त्यांच्याकडे मी सलमान सरांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला आश्वासन दिलं आणि आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. पण त्याठिकाणी आम्हाला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. मला सलमान सरांसोबत फक्त एक फोटो क्लिक करायचा होता. पण त्यासाठी मला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं गेलं.”

“जवळपास 100 जणांच्या युनिटसमोर मला अत्यंत वाईट वागणून मिळाली. त्या 100 जणांपैकी काही लोक मला खूप चांगल्याप्रकारे ओळखायचे. त्या घटनेनंतर मी दहा दिवस नीट झोपूही शकले नाही. मला फक्त सलमान सरांना भेटायचं होतं आणि त्यांच्यासोबत एक फोटो क्लिक करायचा होता. तो तिथे उपस्थितही नव्हता. तरीसुद्धा त्याच्या बाऊन्सर्सनी मला कुत्र्यासारखं बाहेर ढकललं. सलमान तिथे जवळपासच कुठेतरी होता. तो ही घटना घडण्यापासून थांबवू शकला असता. पण त्याने असं काहीच केलं नाही”, अशा शब्दांत तिने नाराजी बोलून दाखवली.

कोण आहे हेमा शर्मा?

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रणदीप हुड्डाच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये हेमाने छोटीशी भूमिका साकारली होती. हेमाचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ‘व्हायरल भाभी’ असं नाव दिलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.