Salman Khan: काय झाकावं आणि काय नाही ? सलमान खानच्या सेटवर मुलींसाठी खास नियम, त्या नियमावर अभिनेत्री काय म्हणाली?
Salman Khan: अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या सेटवर तरूणींची, मुलींची खास काळजी घेतो. सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या मुलींसाठी खास नियम असतात. त्याच्यासोबत एका चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे.

Salman Khan : सलामन खआनसोबत काम करता यावं हे अनेक अभिनेत्रींचं स्वप्न असतं. त्याच्यासोबत ज्या अभिनेत्रींनी काम केलंय त्यांनी तो अनुभव शेअर केला आहे. भाईजान त्याच्या अभिनेत्रींची खास काळजी घेतो हे अनकेदा ऐकायला आलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील विशेष व्यवस्था असते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या महिलांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव मोठ्या गळ्याचे आणि लहान कपडे घालू नयेत या बाबतीत सलमान कडक आहे. अलिकडेच डेझी शाहने सलमानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला.
हॉटरफ्लायशी झालेल्या संभाषणादरम्यान डेझीने काही गोष्टी सांगितल्या. दशकभरापूर्वी आलेल्या जय हो या चित्रपटातून डेझीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सलमान खान सेटवर महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास कशी मदत करतो, असा सवाल तिला विचारण्यात आला होता. त्यावर डेझी म्हणाली की महिलांना चित्रपटात एखादा शोपीस म्हणून दाखवणं हे सलमानला पटत नाही, तो त्या विरोधात आहे. मुलींना जेवढं झाकाल, तेवढ्या त्या सुंदर दिसतील, असे त्याचे (सलमान) विचार असल्याचं डेझीने नमूद केलं.
डेझीने केला खुलासा
यावेळी डेझीने तिच्याबद्दलचाच एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की मला एक ड्रेस घालायचा होता, तो सकाळचा सीन होता, ज्यात मी नुकतीच उठल्याचे, जागी झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण त्यात माझा पोशाख खूप अजब वाटत होता, त्यामुळे तो (सलमान) म्हणाला की तिला चादरीने झाका. झेडी म्हणाली की त्याच्यानुसार, तो नाईट ड्रेस थोडा छोटा होता, असा किस्सा तिने सांगितला.
पलकनेही सांगितला होता असाच किस्सा
यापूर्वी अभिनेत्री पलक तिवारीनेदेखील सलमानच्या विचाराबद्दल, एक असाच किस्सा सांगत खुलासा केला होता. त्याच्या सेटवर महिलांचे कपडे कसे असावेत, याबद्दल सलमानचे काय विचार आहेत, हे तिने नमूद केलं होतं. तिने एका मुलाखतीत अनुभव सांगितला. मी जेव्हा ‘अंतिम’ चित्रपटासाठी सलमान सरांसोबत काम करत होते, तेव्हा त्यांचा एक नियम होता. माझ्या (चित्रपटाच्या) सेटवर प्रत्येक मुलीची नेकलाईन (ड्रेसचा गळा) लहान असला पाहिजे , सर्व मुली नीट झाकलेल्या (पूर्ण कपड्यात) असाव्यात आणि त्यांनी चांगल्या,सभ्य मुलींप्रमाणे असावं, असं पलकने नमूद केलं होतं.
इससे पहले, पलक तिवारी ने भी सलमान की सोच को लेकर खुलासा किया था कि उनके सेट पर महिलाओं को कैसे कपड़े पहनने चाहिए. उन्होंने सिद्धार्थ कन्नन से कहा, “जब मैं सलमान सर के साथ ‘अंतिम’ में काम कर रही थी, तो सलमान सर का एक नियम था कि मेरे सेट पर हर लड़की की नेकलाइन यहां होनी चाहिए, सभी लड़कियों को ढका हुआ होना चाहिए, अच्छी और सभ्य लड़कियों की तरह.
ती असेही म्हणाली की तो (सलमान) खूप पारंपारिक आहे. ज्याला जे घालायचं ते त्यांनी घालावं पण माझ्या मुली नेहमी सुरक्षित रहाव्यात असं त्याला वाटतं. जर आजूबाजूला असे काही पुरुष असतील ज्यांना तो वैयक्तिकरित्या ओळखत नसेल, तर ही त्यांची वैयक्तिक जागा नाही. तिथे तो सर्वांवर विश्वास ठेवत नाही. मुलगी नेहमीच सुरक्षित असावी असं त्याचं मत आहे.
