AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्यूमरच्या त्रासाने ग्रासली अभिनेत्री दीपिका, प्रकृती खालावली; पतीने दिली हेल्थ अपडेट

अभिनेत्री दीपिका कक्कड लिव्हर ट्यूमरने ग्रासली आहे. आता तिला ताप आला असून प्रकृती खालावली आहे. चाहते दीपिका लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

ट्यूमरच्या त्रासाने ग्रासली अभिनेत्री दीपिका, प्रकृती खालावली; पतीने दिली हेल्थ अपडेट
Actress DeepikaImage Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2025 | 12:04 PM
Share

अभिनेत्री दीपिका कक्कड सध्या कठीण काळातून जात आहे. दीपिकाला ट्यूमर झाला आहे. दीपिकाची प्रकृती सध्या बिकट असून त्यावर तिचा पती आणि अभिनेते शोएब इब्राहिम यांनी माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या यकृतात टेनिसच्या चेंडूच्या आकाराचे ट्यूमर आहे. ट्यूमरच्या वेदनांदरम्यान तिला तापही आला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोएब इब्राहिमने त्याच्या अलीकडील यूट्यूब व्लॉगमध्ये दीपिकाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, तापामुळे दीपिकाची शस्त्रक्रिया लांबणीवर गेली आहे.

शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये सांगितले, “मी यापूर्वी अपडेट देऊ शकलो नाही कारण मी व्यस्त होतो. दीपिकाची शस्त्रक्रिया अजून बाकी आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. दीपिकाने मागील वेळी जेव्हा आम्ही रुग्णालयात गेलो होतो, तेव्हा काही चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर दीपिकाने रुहानचे दूध सोडवले आहे. आम्हाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जायचे होते. पण दीपिका आजारी पडली आणि तिला तीव्र ताप आला.” वाचा: एका हंगामात IPL टीम किती पैसे कमावतात? BCCI कडूनच मिळतात 400 कोटी

शस्त्रक्रिया का झाली नाही, डॉक्टरांनी दिली ही तारीख

अभिनेत्याने पुढे सांगितले की, दीपिकाचा ताप 103 अंशांपेक्षा जास्त होता. याशिवाय तिला शरीरात खूप वेदना देखील होत होत्या. तिने अनेक औषधे घेतली, पण त्यावेळी कोणतीही औषधे परिणामकारक ठरली नाहीत. शोएब इब्राहिमने हेही सांगितले की, आता दीपिका बरी वाटत आहे. त्यामुळे डॉक्टर सोमवार, 26 मे रोजी तिच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया करू शकतील.

त्याने पुढे सांगितले की, शेवटी डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांनंतर आम्हाला काय करायचे ते कळेल. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, तिच्या शरीरात एक ट्यूमर आहे ज्याला काढणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होऊ शकते, जेव्हा उरलेल्या चाचण्या देखील पूर्ण होतील. यासह, शोएबने सर्वांना दीपिकासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आणि सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली.

या महिन्याच्या सुरुवातीपासून दीपिका त्रस्त

नुकताच शोएब इब्राहिमने सांगितले होते की, या महिन्याच्या सुरुवातीपासून दीपिकाच्या पोटात दूखत होते. सुरुवातीला संसर्ग समजून तिला औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण, जेव्हा वेदना वाढल्या, तेव्हा अभिनेत्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने काही स्कॅन केले. त्यामध्ये यकृतात ट्यूमर असल्याचे निदान झाले. सीटी स्कॅनमधून समजले की, दीपिकाच्या यकृताच्या डाव्या भागात एक ट्यूमर आहे. हा ट्यूमर टेनिसच्या चेंडूच्या आकाराचा आहे. हे आमच्यासाठी खूप धक्कादायक होते.

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी