AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका हंगामात IPL टीम किती पैसे कमावतात? BCCI कडूनच मिळतात 400 कोटी

आजच्या काळात आयपीएल ही केवळ एक स्पर्धा राहिलेली नाही, तर ती एक बिझनेस मॉडेल बनली आहे. ही मोठमोठ्या ब्रँड्स आणि गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. अशा परिस्थितीत, चला जाणून घेऊया की आयपीएलमधील संघांना या बिझनेस मॉडेलमधून कुठकुठून आणि किती पैसा मिळतो

एका हंगामात IPL टीम किती पैसे कमावतात? BCCI कडूनच मिळतात 400 कोटी
IPL TeamsImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: May 20, 2025 | 12:41 PM

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हे फक्त एक क्रिकेट टूर्नामेंट नाही, तर एक मेगा बिझनेस मॉडेल आहे. दरवर्षी आयपीएलचा थरार केवळ खेळाडू आणि प्रेक्षकांनाच नाही, तर मोठमोठ्या ब्रँड्स आणि गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करतो. 2007 मध्ये आयपीएल सुरू झाली. तेव्हा पासून जगातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या क्रिकेट लीगपैकी एक बनली आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूसारख्या टीम आज कोट्यवधींची कमाई करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, या टीम पैसे कसे कमावतात? चला, त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांविषयी सोप्या भाषेत समजून घेऊ.

BCCI कडून सेंट्रल रेव्हेन्यू:

बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI), जे आयपीएलचं संचालन करते, त्याच्याकडून सेंट्रल रेव्हेन्यू मिळतो. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

-ब्रॉडकास्टिंग राइट्स: BCCI ला आयपीएल प्रसारणासाठी मीडिया राइट्समधून अब्जावधी रुपये मिळतात. 2023-2027 च्या मीडिया राइट्स डीलमधून BCCI ने 48,390 कोटी रुपये कमावले. ज्यामध्ये स्टार स्पोर्ट्स टीव्ही प्रसारण आणि जिओहॉटस्टार ऑनलाइन स्ट्रीमिंगचा समावेश आहे. वाचा: देशाशी गद्दारी केल्यावर काय शिक्षा मिळते? यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं पुढे काय होणार, वाचा

-सेंट्रल स्पॉन्सरशिप्स: टाटा, ड्रीम11, सीएट, स्विगी इन्स्टामार्टसारख्या कंपन्या BCCI ला मोठी रक्कम देतात, ज्या आयपीएलशी जोडल्या जाण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करतात. BCCI या उत्पन्नाचा सुमारे 45% हिस्सा 10 टीमांमध्ये समान रीतीने वाटतो. म्हणजेच, प्रत्येक टीमला वर्षाला सुमारे 400 कोटींपेक्षा जास्त कमाई मिळते.

टीमचे स्वतःचे स्पॉन्सरशिप डील्स:

प्रत्येक टीम आपल्या स्पॉन्सर्सकडूनही मोठी रक्कम कमावते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: -जर्सी स्पॉन्सर (फ्रंट जर्सी स्पॉन्सर): ही सर्वात मोठी डील असते. याशिवाय जर्सीच्या मागील बाजूस, हातांवर आणि कॅपवर लावलेले ब्रँड्सही पैसे देतात.

-डिजिटल आणि सोशल मीडिया पार्टनर्स: टीम सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ब्रँड्ससोबत मोहिमा राबवतात. उदाहरणार्थ: 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा फ्रंट जर्सी स्पॉन्सर Slice होता. RCB ने Qatar Airways सोबत डील केली. CSK ने TVS Eurogrip समेत अनेक ब्रँड्सशी करार केले. टॉप टीम वर्षाला 70 ते 100 कोटी रुपये स्पॉन्सरशिपमधून कमावतात. चेन्नई सुपर किंग्सने 2024 मध्ये 95.5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

तिकिट विक्रीतून कमाई (मॅच डे रेव्हेन्यू):

जेव्हा एखादी टीम आपल्या होम ग्राऊंडवर मॅच खेळते, तेव्हा तिकिट विक्रीतून चांगली कमाई होते. तिकिट विक्रीचा मोठा हिस्सा टीमला मिळतो, तर काही हिस्सा स्थानिक क्रिकेट असोसिएशन आणि BCCI ला जातो. विशेषतः जेव्हा मुंबई, बेंगलुरू आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मॅच होते, तेव्हा तिकिटांची मागणी खूप जास्त असते. उदाहरणार्थ: 2024 मध्ये मुंबईतील एका हाय-डिमांड मॅचमध्ये तिकिट 800 ते 10,000 रुपयेपर्यंत विकले गेले. यामुळे संपूर्ण हंगामात टीमनी तिकिट विक्रीतून 20 ते 30 कोटी रुपये कमावले.

मर्चेंडाइज विक्री:

फॅन्स आपल्या आवडत्या टीमच्या जर्सी, कॅप्स, मग्स आणि इतर वस्तू खरेदी करतात. टीम ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन रिटेलद्वारे या वस्तू विकतात. विशेषतः मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससारख्या टीमच्या मर्चेंडाइजची विक्री भारताबरोबरच परदेशातही होते. ही कमाईचा छोटा हिस्सा आहे, पण ब्रँड बिल्डिंगसाठी उपयुक्त स्रोत आहे.

प्राइज मनी:

आयपीएलमध्ये टॉप पोजिशनवर येणाऱ्या टीमांना BCCI कडून बक्षीस रक्कम मिळते. उदाहरणार्थ, 2024 च्या आयपीएलमध्ये विजेत्याला 20 कोटी रुपये, उपविजेत्याला 12.5 कोटी आणि तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील टीमांना प्रत्येकी 7 कोटी रुपये मिळाले. ही रक्कम खेळाडू आणि फ्रँचायझी यांच्यात परस्पर समजुतीनुसार वाटली जाते.

खेळाडूंची अदलाबदल आणि ट्रान्सफर:

टीम एकमेकांशी खेळाडूंची अदलाबदल करतात. कधीकधी यात रोख सौदेही होतात. हा नियमित कमाईचा स्रोत नसला, तरी योग्य रणनीतीने टीमला फायद्यात ठेवता येते.

ब्रँड व्हॅल्यू आणि गुंतवणूक:

जसजशा टीम प्रसिद्ध होतात, तसतसं त्यांचं ब्रँड व्हॅल्यू वाढतं. आयपीएल फ्रँचायझींचं ब्रँड व्हॅल्यू गेल्या काही वर्षांत गगनाला भिडलं आहे. 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचं ब्रँड व्हॅल्यू 1,800 कोटींपेक्षा जास्त झालं. याशिवाय मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूही फार मागे नव्हते.

मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला.
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा.
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य.
शिंदे सेनेकडून ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर, नेमकं काय म्हटलंय?
शिंदे सेनेकडून ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर, नेमकं काय म्हटलंय?.
अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी
अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी.
पहलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 'त्या' दोघांना NIA कडून बेड्या
पहलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 'त्या' दोघांना NIA कडून बेड्या.