मी तिला सोडलं, त्याचा पश्चात्ताप..; दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडचा खुलासा, राष्ट्रपतींकडून मिळालाय Bravery Award
मुझम्मिल हा सुपरमॉडेल असून त्याने पूजा भट्टच्या 'धोखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने 'हॉर्न ओके प्लीज'मध्येही काम केलं होतं.

अभिनेत्री दीपिका पादुकोणचं लग्नाआधी अभिनेता रणबीर कपूर, उद्योगपती विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्या यांच्याशी नाव जोडलं गेलं होतं. परंतु त्यात एक नाव असंही होतं, जे फारसं कोणाला माहीत नव्हतं. अभिनेता आणि मॉडेल मुझम्मिल इब्राहिमने दीपिकाला दोन वर्षे डेट केलं होतं. त्यावेळी दोघंही मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने दीपिकासोबतच्या अफेअरवर मौन सोडलं. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुझम्मिलने दीपिकाशी ब्रेकअप करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं.
“आम्ही जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. दीपिका मुंबईत आल्यानंतर सर्वांत आधी मलाच भेटली होती. त्यावेळी ती खूपच कॉन्फिडंट होती, कारण ती प्रकाश पादुकोण यांची आहे मुलगा आहे. त्यामुळे प्रत्येकजण तिला ओळखत होतं. दीपिकानेच मला प्रपोज केलं होतं. आम्ही तेव्हा लहान होतो. आम्ही पावसात रिक्षातून प्रवास करायचो. त्यावेळी माझ्याकडे तिच्यापेक्षा जास्त पैसे होते, कारण मी चांगलं कमावू लागत होतो. नंतर मी कार विकत घेतली आणि त्याचा दीपिकाला खूप आनंद झाला होता. या आठवणी अविस्मरणीय आहेत, कारण त्यानंतर मी कधीच कोणासोबत रिक्षातून प्रवास केला नाही. आमच्याकडे त्यावेळी पैसे नसले तरी आम्ही खुश होतो”, असं मुझम्मिल म्हणाला.
View this post on Instagram
मुझम्मिलनेच दीपिकाशी ब्रेकअप केलं होतं, परंतु या गोष्टीची कोणतीच खंत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. “मी तिला सोडलं होतं, त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं. पण मला त्याचा पश्चात्ताप नाही. मी खूप खंबीर आहे. त्यावेळी मी स्टार होतो, ती नव्हती. आता ती सुपरस्टार आहे. प्रत्येकजण आता तिला ओळखतात, मला नाही. मी तिचा मोठा चाहता आहे. मला तिचं काम आवडतं आणि तिच्यासाठी मी खूप खुश आहे,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
दीपिका तिच्या लग्नाआधीही मुझम्मिलच्या संपर्कात होती. याविषयी तो पुढे म्हणाला, “तिच्या लग्नाआधी आम्ही कधीकधी बोलायचो आणि ती नेहमीच गोड बोलते. ब्रेकअपनंतर आमच्यात लगेच मैत्री झाली नव्हती. पण हळूहळू आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. एकमेकांच्या यशाबद्दल आम्ही शुभेच्छा देतो. तिने माझ्यासोबत ज्या आयुष्याचं स्वप्न पाहिलं होतं, तेच आयुष्य ती आता जगतेय. मला कधीच तिच्याविषयी ईर्षा वाटली नाही. कारण मी तसा व्यक्तीच नाही. माझ्या आईलाही ती खूप आवडायची.”
