AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानचं नाव काय घेतलं, धडाधड तुम्ही..; ‘देऊळ बंद 2’च्या मदतीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं

'देऊळ बंद 2' या चित्रपटाची अभिनेता शाहरुख खानने कशी मदत केली, हे प्रवीण तरडेंनी सांगितल्यानंतर काहींनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता खुद्द प्रवीण तरडेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते काय म्हणाले.. सविस्तर वाचा..

शाहरुख खानचं नाव काय घेतलं, धडाधड तुम्ही..; 'देऊळ बंद 2'च्या मदतीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं
देऊळ बंद 2, शाहरुख खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2026 | 9:01 AM
Share

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. तरीसुद्धा या चित्रपटाची चांगली कमाई सुरूच आहे. अशातच एका मुलाखतीत प्रवीण तरडेंनी बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचे आभार मानले. शाहरुखच्या ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ या निर्मिती कंपनीने ‘देऊळ बंद 2’ची मोठी मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. चित्रपटाला मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो DCP म्हणजेच डिजिटल सिनेमा पॅकेजचा बिल येतो, तो शाहरुखने पूर्णपणे माफ केल्याचा खुलासा प्रवीण तरडेंनी केला होता. हा बिल जवळपास 42 लाख रुपयांचा होता. मात्र यावरून आता नेटकरी प्रवीण तरडेंनाच ट्रोल करू लागले आहेत.

‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाचा बजेट जवळपास आठ ते दहा कोटी रुपये इतका आहे. तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल 82 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. प्रवीण तरडेंनी शाहरुखचे आभार मानताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट इतका यशस्वी ठरत असताना ते शाहरुखचे का आभार मानत आहेत, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. त्यावर आता खुद्द प्रवीण तरडेंनीच उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे म्हणाले, “सगळं फिरलो की.. उन्हातान्हात.. 48 डिग्रीत.. तेव्हा तुम्ही कुणीही कुठल्या पोस्ट नाही टाकल्या हो, कुणी लिहिलं नाही कुठलं. माझ्या या मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या दिग्गजांनी पण. एक बॉलिवूड स्टारचं नाव काय घेतलं.. धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या. म्हणजे मराठी माणसाने पब्लिसिटीसाठी नेमकं करायचं काय? खेड्यापाड्यातून, उन्हातान्हात आपल्या प्रेक्षकांना भेटत फिरायचं की मस्त एसीमध्ये बसून एखाद्या बॉलिवूड स्टारचं नाव घ्यायचं? मग तुम्ही मोकळे.. मी तुमच्या पोस्ट वाचल्या. लक्षात ठेवा.. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी ‘देऊळ बंद 2’ शंभर कोटीला जाणार आणि चालला आहे. तुमच्या टीकांनी फरक पडत नाही.”

यावेळी प्रवीण तरडेंनी विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख करत पुढे म्हणाले, “उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा.. श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा. मग तो पिट्या असू दे, सुन्या 32 असू दे किंवा शाहरुख असू दे. ज्याने आपली मदत केली, जाहीरपणे त्याचं कौतुक आणि कबुली देता आली पाहिजे.” त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा