देव आनंद त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते? परंतू त्या पार्टीत राज कपूरमुळे सगळंच बिघडलं
ज्येष्ठ अभिनेते देव आनंद त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते. देव आनंद हे त्यावेळी विवाहित होते त्यांना मुले देखील होते तरीही ते त्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. पण एका पार्टीत राज कपूर यांच्यामुळे असा काही किस्सा घडला की ज्यामुळे देव आनंद फार दुःखी झाले होते. नक्की काय घडलं होतं.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. देव आनंद त्यांच्या चित्रपट आणि कथांद्वारे ते त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतं. देव आनंद हे अनेक महिला चाहत्यांचे क्रश होते. त्यांना पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असे. त्यांच्या डॅशिंग लूकने अनेक महिलांची मने जिंकली, परंतु प्रेमात त्यांना अपयश मिळालं होतं. देव आनंद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तेवढेच चर्चेत राहिले आहेत. ते विवाहित असतानाही एका 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते.
देव आनंद यांनीच त्या अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये ब्रेक देखील दिला होता.
ही अभिनेत्री त्यावेळी प्रसिद्धी झोतात होती. तसेच या अभिनेत्री देव आनंद यांच्यासोबत सहकलाकार म्हणून कामही करत होती. तसेच देव आनंद यांनीच त्या अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये ब्रेक देखील दिला होता. सोबत काम करत असताना ते अभिनेत्रीच्या प्रेमात पडले पण राज कपूर यांच्यामुळे देव आनंद यांचे मन कुठेतरी दुखावले गेले. देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. झीनत यांच्याबद्दल देव आनंद यांनी लिहिले आहे की, “ती जेव्हा जेव्हा कोणत्याही गोष्टीबद्दल, कशाहीबद्दल बोलायची तेव्हा ती ग्लो करायची. मला ती खूप आवडायची. आम्ही एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडले गेलो होतो.” देव आनंद यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचं नाव “रोमान्सिंग विथ लाईफ” असून ते 2007 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.
राज कपूर यांच्या वागण्यामुळे देव आनंद यांचे मन दुखावले गेले
देव आनंद यांनी झीनत यांना प्रपोज करण्यासाठी एक खास जागाही निवडली होती. पण अभिनेत्रीने त्यांना तशा नजरेने कधीही पाहिले नसल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या आत्मचरित्रात एक किस्साही त्यांनी मांडला आहे, की एका पार्टीत राज कपूर नेहमीप्रमाणे झीनतसोबत फ्लर्ट करताना दिसले आणि झीनतनेही त्यांना थांबवले नाही, ज्यामुळे देव आनंद खूप दुःखी झाले होते आणि त्यांनी त्यावेळी अखेर कायमचीच माघार घेतली. रिपोर्ट्सनुसार, झीनतला त्यांच्यात रस नव्हता. देव आनंद यांना त्यांच्याबद्दल असे वाटत असेल याची झीनत यांना कल्पना नव्हती याची झीनत यांना कल्पना नव्हती. देव आनंद यांचे लग्न कल्पना कार्तिकशी झाले होते. त्यांना दोन मुले होती. 2011 मध्ये त्यांचे निधन झाले.
