सिगारेटने स्वतःला जाळलं, रात्रभर रडले, ‘ती’ अभिनेत्री…, जिच्या प्रेमात राज कपूर झाले उद्ध्वस्त

Raj Kapoor: जिच्या प्रेमात राज कपूर झाले उद्ध्वस्त तिने केलं दुसऱ्याच अभिनेत्यासोबत लग्न, अखेर राज कपूर यांनी सिगरेटने स्वतःला जळालं, रात्रभर रडत राहिले... आणि..., राज कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिले...

सिगारेटने स्वतःला जाळलं, रात्रभर रडले, 'ती' अभिनेत्री..., जिच्या प्रेमात राज कपूर झाले उद्ध्वस्त
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 4:47 PM

Raj Kapoor Love Life: ‘नाम मेरा जोकर’, ‘संगम’, ‘बॉबी’, ‘दिवानी’ आणि ‘प्रेम रोग’… असे किती सिनेमे आहेत, ज्यांचं नाव निघाल्यानंतर राज कपूर यांच्या आठवणी ताज्या होतात. 14 डिसेंबर म्हणजे राज कपूर यांची 100 वी जयंती… राज कपूर यांची 100 जयंती कपूर कुटुंब मोठ्या थाटत साजरी करत आहेत. सांगायचं झालं तर, राज कपूर यांनी एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले. पण ते फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिले. एक प्रसिद्ध अभिनेत्रीवर असलेल्या प्रेमामुळे राज कपूर यांनी स्वतःला उद्ध्वस्त केलं. पण त्या अभिनेत्रीने मात्र दुसऱ्या अभिनेत्यासोबत संसार थाटला.

ज्या अभिनेत्रीसोबत राज कपूर यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली त्या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून नरगिस होत्या. नरगिस आणि राज कपूर यांनी ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘अनाडी’, ‘चोरी-चोरी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. एकत्र काम करता – करता दोघांमधील जवळीक वाढली. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील बॉलिवूडमध्ये तुफान रंगल्या. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. रुपेरी पडद्यावर राज कपूर – नरगिस यांची जोडी तुफान गाजली.

पण खऱ्या आयुष्यात मात्र सर्व काही उलटं झालं. 1958 मध्ये नरगिस यांनी राज कपूर यांची साथ सोडून अभिनेचे सुनील दत्त यांच्यासोबत संसार थाटला. नरगिस यांच्या लग्नानंतर राज कपूर यांच्यावर मोठं संकट कोसळलं. नरगिस यांची साथ सुटल्यानंतर राज कपूर स्वतःला सावरु शकले नाहीत.

मधु जैन यांच्या The Kapoors: The First Family of Indian Cinema पुस्तकात राज कपूर यांच्या खासगी आयुष्याबद्दल लिहिलं आहे. राज कपूर यांनी तेव्हा सांगितल्यानुसार, प्रेमात फसवणूक झाल्यानंतर राज कपूर प्रचंड दुःखी होते. ते बाथरुममध्ये जाऊन रडायचे आणि सिगरेटने त्यांनी स्वतःला चटके देखील दिले होते.

‘नरगिसने मला फसवलं’

राज कपूर यांच्या पुस्तकानुसार, ‘प्रत्येक जण मला म्हणतो की, मी नरगिस यांना नाराज केलं आहे. पण त्यांनी माझी फसवणूक केली हे सत्य आहे…’ रिपोर्टनुसार, नरगिस यांच्या लग्नाबद्दल कळताच राज कपूर मित्रांसमोर रडले होते. या वेदना राज कपूर सहन करु शकले नाहीत.. अशात त्यांनी स्वतःला सिगरेटने चटके देण्यास सुरुवात केली.

एवढंच नाही तर, राज कपूर प्रचंड दारु देखील प्यायला लागले होते. त्यांच्या अशा वागणुकीमुळे पत्नी कृष्णा कपूर आणि कुटुंबिय देखील त्रासले होते. राज कपूर यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या, ‘नशेत ते कायम बाथटबमध्ये बेशुद्ध व्हायचे… रात्रभर ढसाढसा रडायचे आणि हे रोज रात्री व्हायचं…’

पुस्तकात लिहिल्यानुसार, राज कपूर यांचं नरगिस यांच्यावर खरं प्रेम होतं. नरगिस यांच्यासाठी राज कपूर पत्नीला सोडण्यास देखील तयार झाले होते. पण राज कपूर यांनी कधीच नरगिस यांच्याबद्दल वाईट शब्द काढला नाही. पण राज कपूर यांनी नरगिस यांच्या भावांवर गंभीर आरोप केले. नरगिस यांच्या भावांमुळे आम्ही विभक्त झालो… असं राज कपूर यांना कायम वाटायचं…

शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.