AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्टीत धर्मेंद्रने या कलाकाराच्या कानशिलात लगावली, नंतर थेट…

बॉलीवूड मध्ये हीमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेते धर्मेंद्र यांचा राग संपूर्ण इंडस्ट्रीला ठाऊक आहे. एकदा त्यानी रागाच्या भरात असं काही केलं, ज्याची चर्चा आजही होते..

पार्टीत धर्मेंद्रने या कलाकाराच्या कानशिलात लगावली, नंतर थेट...
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 04, 2025 | 1:21 PM
Share

ऋतिक रोशनचे माजी सासरे आणि झायेद खानचे वडील संजय खान हे 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचा मोठा भाऊ त्यांच्यापेक्षाही प्रसिद्ध होता,  त्याचे नाव फिरोज खान होते. संजय खान यांनी नुकताच आपला 84 वा वाढदिवस साजरा केला आहे. जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित एक प्रसिद्ध घटना. संजय खान बद्दल इंडस्ट्रीत अनेक गोष्टींची चर्चा होत असली तरीही ही गोष्ट धर्मेंद्र यांच्याशी संबंधित आहे. धर्मेंद्र हे जेवढे उदार म्हणून ओळखले जातात तेवढेच ते आपल्या काळात रागीष्ट होते असे सांगितले जाते. आपल्या मेहनतीने त्यांनी इंडस्ट्रीमध्ये ते स्थान निर्माण केले होते ज्यासाठी लोक नेहमीच धडपड करत असतात. धर्मेंद्र बद्दल देखील अनेक गोष्टी प्रसिद्ध आहे की ते खूप पार्टी करायचे आणि संजय खानशी संबंधित ही गोष्ट देखील एका पार्टी मध्ये घडली आहे.

धर्मेंद्रने संजय खानला मारली होती कानाखाली

धर्मेंद्र आणि संजय खान यांनी 1964 मध्ये आलेल्या हकीकत या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटातून अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर धर्मेंद्र यांनी सर्वांशी चांगली ओळख करण्यासाठी पार्टी आयोजित केली होती. लोकांसोबत बोलण्यासाठी आणि त्यांना समजून घेण्यासाठी धर्मेंद्र पार्टीचे आयोजन करायचे. या पार्टीला संजय खानलाही आमंत्रित करण्यात आले होते. शूटिंग मधून शिफ्ट संपवून जेव्हा संजय खान या पार्टीला पोहोचले तेव्हा धर्मेंद्र यांची पार्टी असल्याने त्यांनी संजय खानला वेलकम ड्रिंक दिली.

पार्टी सुरू झाल्यानंतर संजय खानने एवढी दारू प्यायली की ते खूप मद्यधुंद झाले आणि फिल्म इंडस्ट्री बद्दल तोंडाला येईल तसे बोलू लागले. प्रकरण आणखीन बिघडू नये म्हणून धर्मेंद्र यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र संजय खान दारूच्या नशेत खूप बोलले. त्या वेळचे प्रसिद्ध अभिनेते ओमप्रकाश यांना शिवीगाळ सुरु केल्याने प्रकरण वाढले. धर्मेंद्र हे ओमप्रकाश यांची खूप इज्जत करायचे त्यांना मान द्यायचे. या प्रकारानंतर धर्मेंद्रला राग आला आणि त्यांनी संजय खान यांना सर्वांसमोर कानाखाली मारली.

धर्मेंद्र यांनी मागितली होती फिरोज खानची माफी

संजय खान हे काहीही न बोलता तिथून बाहेर पडले होते आणि नंतर धर्मेंद्र यांना त्यांची चूक समजली. धर्मेंद्रला त्यांची चूक समजल्यानंतर त्यांनी फिरोज खानची माफी मागितली. दुसऱ्याच दिवशी धर्मेंद्र फिरोज खानच्या घरी पोहोचले आणि संजय खानला भेटायचे असल्यास सांगितले. फिरोज खान यावेळी म्हणाले होते की “तो चुकीचा बोलला होता त्यामुळे तुम्ही त्याला त्याची शिक्षा दिली तुम्ही योग्यच केले जर मी त्या जागी असतो तर मी देखील तेच केले असते”. नंतर संजय खान यांनीही हे प्रकरण विसरून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आणि प्रीमियर मध्ये दोघांनीही गळाभेट घेतली होती.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?