Dhurandhar : माझा एक व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा फिल्मला उद्धवस्त करायला काफी, आज रात्री येणार, नाव न घेता धुरंधरला चॅलेंज
Dhurandhar : धुरंधर चित्रपटाची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. हा चित्रपट कमाईचे रोज नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. धुरंधर चित्रपटाची प्रेक्षकांवरील जादू कमी झालेली नाही. आता एकाने माझा एक व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा फिल्मला उद्धवस्त करायला काफी असं म्हटलं आहे.

राजकीय विश्लेषक आणि कंटेट क्रिएटर ध्रुव राठी याने धुरंधर चित्रपटाविरोधात पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राठीने चित्रपटाचं नाव न घेता शनिवारी एक टि्वट केलं. ‘माझा एक व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उद्धवस्त करेल’ असं ध्रुव राठीने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भारतात धुरंधर चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला. मागच्या महिन्यात नोव्हेंबर मध्ये चित्रपटाच ट्रेलर रिलीज झाला. त्यामध्ये दाखवलेल्या हिंसाचारावरुन राठीने चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरवर टीका केली होती. शनिवारी दुपारी ध्रुव राठीने एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्याने म्हटलं की, “लवकरच मी चित्रपटावर एक व्हिडिओ रिलीज करणार आहे. 1 युट्यूब व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उद्धवस्त करेल” असं त्याने म्हटलं आहे. ‘या व्हिडिओनंतर त्यांची वाईट अवस्था होईल. ते यासाठी तयार नाहीयत. आज रात्री रिलीज होणार आहे’ असं ध्रुव राठीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्याने चित्रपटाचं नाव जाहीर केलेलं नाही. पण अनेकांनी पोस्टला रिप्लाय करताना हा धुरंधरबद्दल बोलणार आहे असं म्हटलं आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षातील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला. भारतात नेट 480 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 740 कोटींची कमाई केली आहे.
छळवादाची दृश्य इसिसच्या शिरच्छेदासमान
राठीने धुरंधर चित्रपटावर हल्लाबोल करण्याची पहिली वेळ नाही. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर त्यातील हिंसाचारावरुन राठीने दिग्दर्शक आदित्य धरवर टीका केली होती. “आदित्य धरने बॉलिवूडमध्ये खालची पातळी गाठण्याची मर्यादा ओलांडली आहे. टोकाचा हिंसाचार, छळवादाची दृश्य इसिसच्या शिरच्छेदासमान आहेत. त्याला मनोरंजन म्हणतात” असं राठीने लिहिलं होतं. “पैशासाठीची लालसा दिसून येते. तो तरुण पिढीच्या मनात विष कालवत आहे. छळवादाचं उदात्तीकरण चालवलं आहे” अशी टीका या ध्रुव राठीने केली होती. धुरंधर चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचत आहे. या वीकेंडला सुद्धा हा चित्रपट बक्कळ कमाई करेल अशी शक्यता आहे.
