Dhanush Aishwarya Divorce | मुलीचं लग्न वाचवण्यासाठी बापाचे प्रयत्न? धनुष टाळत होता रजनिकांतची भेट?

Dhanush Aishwarya Divorce | मुलीचं लग्न वाचवण्यासाठी बापाचे प्रयत्न? धनुष टाळत होता रजनिकांतची भेट?
रजनिकांतचा मुलगी आणि जावयासोबतचा फोटो

धनुषच्या पत्नीचं नाव ऐश्वर्या असून ती तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ऐश्वर्या ही धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी असून 2004 साली ते दोघंजण लग्नाच्या बंधनात अडकले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 19, 2022 | 8:10 PM

सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या विभक्त होत असल्याच्या वृत्तानं एकच खळबळ उडालेली असतानाच आता रजनिकांत यांच्या बाबत एक नवी माहिती समोर आली आहे. रजनिकांत हे धनुषचे (Dhanush) सासरे असून ते आपल्या मुलीचं लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं बोललं जातंय. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता आणि निर्माता धनुष आपल्या सासऱ्यांना नाही कसं म्हणायचं, या विचारात असल्यानं त्यानं रजनिकांत यांची भेट घेणं जाणीवपूर्वक टाळल्याचं सांगितलं जातंय. रजनिकांत (Rajanikant) आपल्या मुलीचा संसार आणि तिचं धनुषसोबतचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र धनुषनं रजनिकांत यांना भेटणं टाळलं, असल्याचाही दावा केला जातोय.

काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर पोस्ट करत धनुषनं आपल्या लग्नाबाबत माहिती चाहत्यांना एकच धक्का दिला होता. ट्विटरवर पोस्ट करत धनुषनं आपल्या पत्नीसोबत विभक्त होण्याच्या आपल्या निर्णयाचा तुम्ही सगळ्यांना आदर करावा, असंही म्हटलं होतं. 18 वर्षांची सोबत, मैत्री, कपल, पॅरेन्ट्स आणि एक दुसऱ्याचे शुभचिंतक म्हणून आम्ही एकमेकांसोबत संसार केला. पण आज आम्ही जिथे उभे आहोत, तिथून आमचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत, असं धनुषनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

धनुषच्या पत्नीचं नाव ऐश्वर्या असून ती तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ऐश्वर्या ही धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी असून 2004 साली ते दोघंजण लग्नाच्या बंधनात अडकले होते. यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं त्यांना आहेत. नुकताच समांथा आणि नागा चैतन्य यांच्यापाठोपाठ आता धनुष आणि ऐश्वर्याही विभक्त झाले आहेत. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच आमीर आणि किरणही विभक्त झाले होते. विशेष म्हणजे धनुष आणि ऐश्वर्या कायदेशीररीत्या विभक्त होणार नसल्याचंही सांगितलं जातंय. आपल्या मुलांचा सांभाळ करण्याकरता ते सोबत असतील असंही सांगितलं जातंय.

संबंधित बातम्या :

5 मिनिटाच्या आयटम साँगसाठी नोरा घेतेय 50 लाख, समांथाचा आकडा ऐकून तुम्हाला आकडी येईल!

Dhanush aishwarya Divorce : अभिनेता धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर चाहत्यांमध्ये नाराजी तर राम गोपाल वर्मा म्हणतात,’घटस्फोटाचा उत्सव साजरा करा!’


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें