सनी देओलने हेमा मालिनीवर हल्ला केला होता? धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने सत्य आणले समोर

Sunny Deol and Hema Malini : धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याने सावत्र आई हेमा मालिनी यांच्यावर हल्ला केला होता असं बोललं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सनी देओलने हेमा मालिनीवर हल्ला केला होता? धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने सत्य आणले समोर
Sunny Deol and Hema Malini
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 28, 2025 | 8:58 PM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या पश्चात दोन पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून धर्मेंद्र यांना चार मुले आहेत. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न केले, मात्र त्यांनी पहिले लग्न मोडले नाही. धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल त्यावेळी 24 वर्षांचा होता आणि तो वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज होता अशी माहिती समोर आली आहे.

सनी देओलने हेमा मालिनीवर हल्ला केला?

सनी देओलने आपल्या वडिलांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही बातम्यांमध्ये केला जात आहे. मात्र आता याबाबत धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी मोठा खुलासा केला आहे. स्टारडस्टला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत प्रकाश कौर यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते आणि मला मी माझ्या मुलांवर केलेल्या संस्कारांर आणि संगोपनावर पूर्ण विश्वास असल्याचे विधान केले होते.

मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले…

याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रकाश कौर यांनी म्हटले की, हे खोटे आहे. प्रत्येक मुलाला त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईपेक्षा जास्त प्रेम करावे असे वाटते. मात्र याचा अर्थ असा नाही की, जर दुसरी महिला त्याच्या वडिलांवर प्रेम करत असेल तर तो तिच्यावर हल्ला करेल. मी जास्त शिकलेली नाही, पण माझ्या मुलांना वाटते की मी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे. मी माझ्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवले ​​आहे आणि त्यांना चांगले संस्कार दिले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की ते कधीही कोणालाही दुखावणारे कृत्य करणार नाहीत.

धर्मेंद्र यांना 6 मुले

प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांची चार मुले आहेत. दोन मुले आणि दोन मुली. सनी आणि बॉबी देओल हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. मात्र, धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुली चित्रपटांपासून दूर आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत. त्यांची नावे ईशा आणि अहाना देओल आहे. धर्मेंद्र यांनी कायमच आपल्या सहा मुलांवर प्रचंड प्रेम केले.