मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचं 12वं पर्व खूप चर्चेत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक एकाहून एक सरस गाणी गात आहेत. यातच मराठमोळी स्पर्धक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) हिच्या नावाची चर्चा सध्या अधिक रंगत आहे. मुळची अहमदनगरची असणाऱ्या अंजलीने या आधीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या गायनाची चुणूक दाखवली आहे. इतकेच नव्हे तर, ‘सारेगमप’च्या लिटील चॅम्प पर्वाची ती विजेती देखील ठरली होती. अंजलीने या कार्यक्रमाच्या ऑडीशनला ‘दिल की तपिश’ हे गाणं सादर केलं होतं (Dil Ki Tapish song by Anjali Gaikwad and Singer Rahul Deshpande).