AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 वेळा रिजेक्ट करण्यात आलेलं गाणं, प्रदर्शित होताच ठरलं सुपरहिट, मुलींचं प्रचंड आवडतं

आदित्य चोप्रा यांनी 24 वेळा रिजेक्ट केलेलं हे गाणं, पण जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हा ठरलं प्रचंड सुपरहिट. अनेक मुलींचं ठरलं आवडतं. आजही अनेक चाहते वेळ काढून हे गाणं ऐकतात.

24 वेळा रिजेक्ट करण्यात आलेलं गाणं, प्रदर्शित होताच ठरलं सुपरहिट, मुलींचं प्रचंड आवडतं
| Updated on: Aug 31, 2026 | 3:35 PM
Share

90 च्या दशकातील अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. मात्र ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची लोकप्रियता आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित आणि यश चोप्रा निर्मित हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक आयकॉनिक आणि क्लासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाणी देखील प्रचंड गाजली होती.

या चित्रपटाशी संबंधित अनेक रंजक किस्से आहेत. त्यापैकीच एक किस्सा ‘मेरे ख्वाबों में जो आए’ या लोकप्रिय गाण्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, हे गाणं अंतिम स्वरूपात येण्यापूर्वी दिग्दर्शक आदित्य चोप्रांनी तब्बल 24 वेळा नाकारलं होतं.

गाणं 24 वेळा का नाकारलं?

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’साठी सर्वप्रथम रेकॉर्ड करण्यात आलेल्या गाण्यांपैकी ‘मेरे ख्वाबों में जो आए’ हे एक गाणं होतं. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले होते. मात्र सुरुवातीला गाण्याच्या शब्दांमध्ये आपल्या चित्रपटाला अपेक्षित असलेली भावना आणि ‘फील’ दिसत नसल्याचं आदित्य चोप्रांना वाटलं.

त्यामुळे त्यांनी गाण्यात वारंवार बदल सुचवले. एक-दोन नाही तर तब्बल 24 वेळा गाण्याचे बोल नाकारण्यात आले. प्रत्येक वेळी आनंद बक्षी यांनी संयमाने गाण्यात सुधारणा केली. अखेर 24 वेळा बदल केल्यानंतर आदित्य चोप्रा यांना गाणं पसंत पडलं आणि ते अंतिम स्वरूपात आलं.

लता मंगेशकरांच्या आवाजाने मिळाली खास ओळख

या गाण्याला जतिन-ललित यांनी संगीत दिलं असून, दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने ते अजरामर केलं. गाण्याची चाल, शब्द आणि लता मंगेशकरांचा मधुर आवाज यामुळे ‘मेरे ख्वाबों में जो आए’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहिलं.

चित्रपटातील प्रसंगाशी अगदी योग्य प्रकारे जुळणारं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यामुळेच 24 वेळा नाकारलं गेलेलं हे गाणं पुढे ‘‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ च्या आयकॉनिक गाण्यांपैकी एक ठरलं. आजही हे गाणं ऐकू आलं तरी लोक ते दिवसभर प्रवासात किंवा रिकाम्या वेळेत ते गुणगुणतात.

Follow Us
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!
ठाकरेंच्या शिवतीर्थावर राऊत दाखल; बंद दाराआड चर्चा, नेमकं काय शिजतंय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या...
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका...
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...