AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिकावर पुन्हा कॅन्सरचे उपचार सुरू, ताप अन् पाठदुखीने हैराण झाली अभिनेत्री; दिले तब्येतीचे अपडेट्स

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करवर सध्या इम्युनोथेरपी सुरू आहे. गेल्या वर्षी तिला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावरील उपचार अजूनही सुरू आहेत. यादरम्यान तिने चाहत्यांना प्रकृतीचे अपडेट्स दिले आहेत.

दीपिकावर पुन्हा कॅन्सरचे उपचार सुरू, ताप अन् पाठदुखीने हैराण झाली अभिनेत्री; दिले तब्येतीचे अपडेट्स
Dipika KakarImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2026 | 11:40 AM
Share

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत सिमरची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. गेल्या वर्षी तिला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. लिव्हरमधील कॅन्सरचा ट्यूमर काढण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता दीपिकावर इम्युनोथेरपी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळले होते. त्यावरही शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले होते. आता दीपिकाने तिच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग पोस्ट करत आरोग्याविषयीचे सर्व अपडेट्स चाहत्यांना दिले आहेत.

या व्लॉगमध्ये दीपिका म्हणाली, “माझ्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण गेले आहेत. त्यात माझेही उपचार सुरू आहेत. माझ्यावर इम्युनोथेरपी सुरू करण्यात आली आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. तुम्हाला माझ्या सासऱ्यांच्या प्रकृतीविषयी आधीपासूनच माहिती आहे आणि आता चांगली बातमी ही आहे की त्यांच्यात सुधारणा होत आहे.”

दीपिकाची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

“नुकताच माझा डबल इम्युनोथेरपीचा एक सेशन झाला. त्यानंतर पुढील सेशन IV ट्रीटमेंटद्वारे सुरू राहतील. आतापर्यंत तरी मला कोणताही मोठा साइड इफेक्ट जाणवला नाही. अर्थात जेव्हा इतकी औषधं शरीरात जातात, तेव्हा एक-दोन दिवसांसाठी थकवा जाणवतो आणि शरीरात त्राण राहत नाही. काहींना हलका ताप किंवा इतर छोटी-मोठी लक्षणं दिसून येतात. माझ्या बाबतीत मला पाठदुखीचा त्रास जाणवला आणि एकदा हलका तापसुद्धा आला होता. कदाचित मी रुग्णालयात होती, म्हणून मला व्हायरल इन्फेक्शन झालं असावं. सुदैवाने सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून चिंतेची कोणतीच बाब नाही”, असं दीपिकाने स्पष्ट केलं.

यापुढेही इम्युनोथेरपी सुरू राहणार असून त्याचसोबत नियमित रक्त तपासणी, ट्युमर मार्कर टेस्ट, स्कॅन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर तपासण्या होत राहतील, असं दीपिकाने सांगितलं. या संपूर्ण काळात पती शोएब इब्राहिम खूप काळजी घेत असल्याची माहिती दीपिकाने चाहत्यांना दिली. “गेल्या वर्षभरापासून तो माझ्या तब्येतीबद्दल खूप काळजी घेत आहे. आता त्याचे वडीलसुद्धा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्याच्यासाठी गोष्टी आणखी कठीण झाल्या आहेत. त्याचा संपूर्ण दिवस रुग्णालयात जातो. त्याच्या दिवसाची सुरुवातच हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर थोड्या विश्रांतीसाठी तो घरी जातो आणि मग पुन्हा कामावर परततो. त्याच्यासाठी हा सर्वांत कठीण काळ आहे”, अशा शब्दांत दीपिका व्यक्त झाली.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ