AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका कक्कर हिने पुनरागमनाबद्दल केला खुलासा, चाहत्यांना बसला धक्का, शोएब इब्राहिम याने…

दीपिका कक्कर ही शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनयापासून दूर गेलीये. दीपिका कक्कर हिचे चाहते सतत तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत होते. दीपिका कक्कर हिने शेवटी तिच्या पुनरागमनाबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. आता यामुळे दीपिकाच्या चाहत्यांना धक्का बसलाय.

दीपिका कक्कर हिने पुनरागमनाबद्दल केला खुलासा, चाहत्यांना बसला धक्का, शोएब इब्राहिम याने...
| Updated on: May 29, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : दीपिका कक्कर हे टीव्ही मालिका क्षेत्रातील एक फेमस नाही आहे. दीपिका कक्कर (Dipika Kakar) हिने आपल्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दमदार अभिनय करताना नेहमीच दीपिका कक्कर ही दिसली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दीपिका कक्कर हिने 2018 मध्ये शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न (Marriage) केले. लग्नानंतरच दीपिका कक्कर फार काही मालिकांमध्ये दिसली नाही. ससुराल सिमर का अशा मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका करताना दीपिका कक्कर ही दिसली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही दीपिका कक्कर हिची बघायला मिळते.

दीपिका कक्कर आता लवकरच आई होणार आहे. शोएब इब्राहिम याच्या पहिल्या बाळाला दीपिका कक्कर जन्म देणार आहे. दीपिका कक्कर हिचे चाहते सतत तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. एक अंदाजा सातत्याने बांधला जात होता की, दीपिका कक्कर ही प्रेग्नसीनंतर मालिकांमध्ये पुनरागमन करेल.

नुकताच दीपिका कक्कर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीनंतर दीपिका कक्कर हिच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसलाय. या मुलाखतीमध्ये दीपिका कक्कर ही टीव्ही मालिकांमधील पुनरागमनावर बोलली आहे. दीपिका कक्कर हिने म्हटले की, ज्यावेळी मी आई होणार हे मला कळाले, त्याचवेळी मी शोएब याला बोलले.

पुढे दीपिका कक्कर म्हणाली की, मी शोएब याला म्हटले की मला आता काम करायचे नाही किंवा मी अभिनय करणार नाहीये. मला बाळाकडे लक्ष देत एका गृहिणीची भूमिका साकारायची आहे. म्हणजेच काय तर दीपिका कक्कर हिने आता स्पष्ट सांगितले आहे की, ती परत कधीच मोठ्या पडद्यावर दिसणार नाहीये.

दीपिका कक्कर हिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. दीपिका कक्कर ही परत कधीच मालिकेमध्ये दिसणार नसल्याने तिचे चाहते देखील निराश झाल्याचे बघायला मिळते. दीपिका कक्कर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ब्लाॅगमध्येही आपल्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे हे नेहमीच दीपिका कक्कर सांगते.

दीपिका कक्कर हिने 22 फेब्रुवारी 2018 ला इस्लाम धर्म स्वीकार करून शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, सुरूवातीला दीपिका हिने धर्मांतराची बाब लपवून ठेवली होती. धर्मांतर केल्यानंतर अनेकांच्या निशाण्यावर दीपिका कक्कर ही आली होती. विशेष म्हणजे दीपिका कक्कर ही बिग बाॅस 12 ची विजेती देखील आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा