Disha Patani | ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’, दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा, चाहतेही झाले घायाळ!

दिशा पाटनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. दिशाने आपल्या हॉट लूकसह फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांनाही घायाळ केले आहे.

Disha Patani | ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’, दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा, चाहतेही झाले घायाळ!
दिशा पटनी

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) अनेकदा आपल्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह राहते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दिशा चाहत्यांसाठी दररोज आपले फोटो शेअर करत असते. दिशाचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात. दिशाने नुकताच पुन्हा एकदा हॉट-बोल्ड फोटो शेअर करत इंटरनेटचा पारा वाढवला आहे (Disha Patani share bold sizzling look on social media).

दिशा पाटनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. दिशाने आपल्या हॉट लूकसह फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांनाही घायाळ केले आहे. दिशाने यापूर्वीही अशाप्रकारचे तिचे स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

पाहा दिशाची ग्लॅमरस स्टाईल

दिशा पाटनीने पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांची झोप उडवली आहे. दिशाच्या या खास लूकवरून चाहत्यांचे डोळे अजिबात हटत नाहीयत.

दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शर्ट ड्रेस प्रकारचे काहीतरी परिधान केलेली दिसली आहे आणि तिने हा ड्रेस तिला खांद्यावरुन किंचित खाली सरकवला आहे. दिशाचा हा हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या लूकसह दिशाने लाईट मेकअप केला आहे. जो तिच्यावर खूप खुलून दिसत आहे.

फोटो शेअर करताना दिशाने गुलाबी रंगाच्या फुलाचा इमोजी कॅप्शनमध्ये टाकला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर चाहतेही बऱ्याच कमेंट करत आहेत (Disha Patani share bold sizzling look on social media).

सलमान खानसोबत पुन्हा एकदा जमणार जोडी!

दिशाने तिच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. ‘भारत’ चित्रपटानंतर अभिनेत्री लवकरच ‘राधे’ या चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार आहे. दिशाच्या चाहत्यांना तिच्या या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा रोमांस करताना दिसणार आहेत. ईदच्या निमित्ताने ‘राधे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या 2015मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगु चित्रपट ‘लोफर’पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर, 2016 मध्ये तिने नीरज पांडे यांच्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर दिशा पाटनीने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. दिशा लवकरच तिच्या आगामी ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

(Disha Patani share bold sizzling look on social media)

हेही वाचा :

Ajay Devgn RRR Look | वाढदिवशी प्रेक्षकांना मोठे रिटर्न गिफ्ट, पाहा अजय देवगणचा ‘RRR’ लूक!

Amitabh Bachchan vaccine : बिग बी सहकुटुंब लसीकरणाला, मात्र ‘या’ कारणामुळे अभिषेकला लस घेता आली नाही!

Published On - 12:43 pm, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI